कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार डॉक्टर आज संपावर, वैद्यकीय सेवा विस्कळीत होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:37 IST2025-09-18T13:37:20+5:302025-09-18T13:37:41+5:30
कोल्हापूर : शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक काढून सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ...

कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार डॉक्टर आज संपावर, वैद्यकीय सेवा विस्कळीत होणार
कोल्हापूर : शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी परिपत्रक काढून सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाला विरोध करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संघटनेने आज, गुरुवारी राज्यस्तरीय संपाची हाक दिली आहे.
आजच्या या संपात जिल्ह्यातील सुमारे २ हजार ६०० हून अधिक डॉक्टर तसेच ‘सीपीआर’मधील ४०० डॉक्टर सहभागी होणार आहेत. यामुळे ‘सीपीआर’मधील वैद्यकीय सेवा काही प्रमाणात विस्कळीत होणार असली तरी या ठिकाणी आणि खासगी दवाखान्यातही आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी सांगितले की, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखेने राज्यातील सर्व संघटनांना संपात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सीपीआर मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. उत्कर्ष देशमुख म्हणाले, ‘गुरुवारी सकाळी आम्ही सर्व वॉर्डमधील नियमित फेऱ्या झाल्यानंतर संपात सहभागी होणार आहोत. यात निवासी डॉक्टर २००, अंतरवासिता १५० आणि वरिष्ठ निवासी ५० डॉक्टरांचा सहभाग राहील.’