शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातून तीनच यात्रेकरू

By admin | Updated: July 8, 2015 00:02 IST

कैलास-मानस सरोवर यात्रा : पावणेदोन लाख रुपये खर्च

कोल्हापूर : कैलास मानस सरोवर या १९ हजार ५०० फुुटांवरील चीनव्याप्त तिबेटमधील यात्रेस जाणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. गेल्या वर्षी सहा यात्रेकरू कोल्हापुरातून गेले होते; तर यंदा केवळी तीनच यात्रेकरूंनी या यात्रेसाठी केंद्र शासनाकडे नोंद केली आहे. या उलट अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यंदा कोल्हापुरातून या यात्रेसाठी सातशेंहून अधिक लोक जात आहेत. कैलास मानस सरोवर यात्रेचे नियोजन भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत केले जाते. याची जाहिरात दरवर्षी फेबु्रवारीमध्ये प्रसिद्ध होते. या यात्रेकरिता सुमारे दोन लाख रुपये इतका खर्च येतो. चीनव्याप्त तिबेटमध्ये याचे स्थान असल्याने यात्रेकरूंकडील पासपोर्ट यासाठी महत्त्वाचा आहे. यंदापासून ही यात्रा उत्तराखंडातील लिपुलेख पासवरून व सिक्कीममधील नथुला पास येथून आयोजित केली जाणार आहे. ८ जून ते ९ सप्टेंबरअखेर ही यात्रा २३ बॅचेसमधून भारतातून सोडली जाणार आहे. यात ६०जणांची एक तुकडी अशा १८ तुकड्या उत्तराखंडातील लिपुमार्गे, तर पाच तुकड्या सिक्कीम नथुलामार्गे सोडण्यात येणार आहेत. यात्रेकरिता सुमारे पावणेदोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय दिल्ली येथे चार दिवस वैद्यकीय तपासणी व व्हिसा याकरिता लागणार आहेत. आपण कोणत्या मार्गाने जाणार हे यात्रेकरूंनी अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे. तीस दिवसांचा यात्रेचा कालावधी व पासपोर्ट, तपासण्या या किचकट बाबींमुळे यात्रेकरूंमध्ये घट होऊ लागली आहे.या उलट भारतातील अमरनाथ या श्री शंकर भोलेनाथांच्या पवित्र गुंफेचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये वाढ होऊ लागली आहे. यंदा कोल्हापुरातून ७०० हून अधिक यात्रेकरू जात आहेत. त्यांतील पहिला जथ्था गुरुवारी रात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसने रवानाही झाला. राज्य शासनाच्या मदतीची गरजगुजरात सरकार कैलास-मानस सरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांना मदत करते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनानेही मदत करावी. या यात्रेत केवळ धार्मिक यात्रा म्हणून न पाहता ट्रेकिंग एक्सपिडिशन अर्थात गिर्यारोहण मोहीम म्हणून पाहणे गरजेचे आहे; कारण यात्रेकरूंना मोठ्या प्रमाणात चालतच जावे लागते. याशिवाय यात्रेकरूंनाही ३० दिवस प्रवास आणि चालण्यासाठी शरीर तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस यात्रेकरूंमध्ये घट होऊ लागली आहे. - सूर्यकांत गायकवाड, मार्गदर्शक, कैलास-मानस सरोवर यात्रा, कोल्हापूर.