Kolhapur News: गव्याने केलेल्या हल्ल्यात बाप-लेकासह तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:09 IST2025-12-27T12:06:42+5:302025-12-27T12:09:13+5:30
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली

संग्रहित छाया
कोल्हापूर : हरपवडे-पणुत्रे मार्गावर आणि तांदूळवाडी (ता. पन्हाळा) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात बापलेकासह तिघेजण जखमी झाले. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
रंगराव केरबा चौगुले (वय ३६ रा. हरपवडे ,ता.पन्हाळा), नथाजी गणू देवणे (वय ६५),नारायण नथाजी देवणे (वय ४६, दोघे रा.तांदूळवाडी, ता.पन्हाळा) अशी जखमींची नावे आहेत.
रंगराव चौगुले शुक्रवारी सकाळी आठ वाजता मोटारसायकलवरून ऊस तोडण्यासाठी जात असताना हरपवडे-पणुत्रे मार्गावरून गव्याचा कळप जात होता. त्यावेळी पाठीमागे राहिलेल्या गव्याने चौगुले यांना धडक दिली.
तांदूळवाडी येथील नथाजी देवणे मुलगा नारायण सोबत दुपारी साडे बारा वाजता उसाला पाणी पाजण्यासाठी गेले असताना गव्याने दोघांवर हल्ला करून जखमी केले. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच बाजारभोगाव येथील परिमंडलचे वनाधिकारी आर. एस. रसाळ यांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.