शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जांभळीतील जिम ट्रेनर खूनप्रकरणातील आरोपी चोवीस तासात गजाआड, इचलकरंजीच्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:44 IST

खुनाचे कारण आज स्पष्ट होण्याची शक्यता

शिरोळ : जांभळी (ता. शिरोळ) येथील जिम ट्रेनर संदीप भाऊसाहेब पाटील (वय ४३) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री इचलकरंजी येथील तिघा आरोपींना अटक केली. मुकेश बाळू जावेर (वय ३२, रा. दत्तनगर, शहापूर), रवींद्र रतन कांबळे (३५, रा. आंबेडकर नगर) व रतन मोहन कांबळे (३३, रा. शास्त्री सोसायटी) अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, खून नेमका कोणत्या कारणातून झाला याचा लवकरच उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.जांभळी येथील संदीप पाटील यांचा बुधवारी रात्री जयसिंगपूर-जांभळी मार्गावरील कुरडे मळ्याजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी वार करून खून केला होता. घटनेनंतर संशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांची चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीत अडकल्याने गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले होते.पोलिसांनी कारच्या मालकाचा शोध घेऊन तपास यंत्रणा राबवली. चार पथकांद्वारे संशयितांची शोध मोहीम राबविण्यात आली. खुनाच्या घटनेत चौघांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली. त्यातील तिघा आरोपींना रात्री अटक केली असून नेमका खून कोणत्या कारणातून झाला याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पत्रकारांना दिली.चोवीस तासांत आरोपी गजाआडघटनास्थळी मिळालेल्या कारवरून संशयितांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळाले. आरोपींनी हे वाहन भाड्याने घेतले होते. पोलिस अधीक्षक योगेश कुमार, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुन्हा उघडकीस आणला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Gym Trainer Murder: Three Arrested Within 24 Hours

Web Summary : Police arrested three Ichalkaranji residents within 24 hours for the murder of gym trainer Sandeep Patil in Jambhali. The suspects were caught after their getaway car got stuck. Police are investigating the motive behind the crime. The swift action led to the arrest.