शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

वाळवा तालुक्यातील तिघा अट्टल चेन स्नॅचरना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:06 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह उपनगरांत रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसडा मारून लंपास करणाऱ्या वाळवा तालुक्यातील तिघा ...

ठळक मुद्देवाळवा तालुक्यातील तिघा अट्टल चेन स्नॅचरना अटक२७ गुन्ह्यांची कबुली : १९ लाखांचे सोने, दोन दुचाकी जप्त

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह उपनगरांत रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसडा मारून लंपास करणाऱ्या वाळवा तालुक्यातील तिघा अट्टल चेन स्नॅचरना पोलिसांनी अटक केली. संशयित नीकेश ऊर्फ बबलू नारायण वडार (वय २३, रा. माळभाग, नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली), सचिन श्रीकांत हिंगणे (२९, रा. बांबवडे, ता. वाळवा), सुनील मोहन रनखांबे (२२, रा. नागेवाडी गल्ली, नेर्ले, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी २५ चेन स्नॅचिंग आणि २ घरफोड्या अशा २७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून १९ लाखांचे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल संतोष माने यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोल्हापूर शहरासह आजूबाजूच्या परिसरात रस्त्यावरून चालत जाणाºया महिलांच्या गळ्यांतील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसडा मारून चोरी करणारा टोळीप्रमुख नीकेश वडार हा कोल्हापुरातील सह्याद्री हॉटेलजवळ येणार आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार व त्यांच्या पथकाने २१ जूनला हॉटेल परिसरात सापळा लावून वडारला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, सचिन हिंगणे व सुनील रनखांबे यांच्या मदतीने दुचाकीचा (एम. एच. १० सी. झेड ८१०३) वापर करून एकूण १२ गुन्हे केल्याची कबुली दिली.

महिलांच्या गळ्यांतील सोन्याचे दागिने रनखांबे याच्यातर्फे विक्री करून त्यातून मिळालेले पैसे तिघांनी वाटून घेतले. त्यानंतर हिंगणे व रनखांबे यांना अटक केली असता, १३ गुन्ह्यांची कबुली दिली. संशयितांकडून शाहूपुरी सहा, राजारामपुरी तीन, जुना राजवाडा दोन, वडगाव चार, करवीर तीन, शाहूवाडी पाच, जयसिंगपूर दोन, शिरोळ एक, कोडोली एक असे २७ गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत तपास करीत आहेत.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर