शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: वडिलांना फोन करून वाईट बोलला, रागातून तिघांनी डोक्यात दगड घालून केला मित्राचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:56 IST

शहापूर येथील घटना : तिघांवर गुन्हा दाखल करून घेतले ताब्यात

इचलकरंजी : वडिलांना फोन करून वाईट बोलल्याच्या रागातून तिघांनी एका मित्राचा खून केला. शाबाज शब्बीर शेख (वय २३, रा. शामरावनगर जाहीर मोहल्ला, सांगली, ता.मिरज) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना शहापूर येथील सोलगे मळा महालक्ष्मीनगर परिसरात निर्जन ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केल्याचे समजते.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!असिफ जिल्लाणी यलकुंद्री, सोहेल सनदी (दोघे रा. शामरावनगर, सांगली,ता.मिरज) आणि असिफचा आत्येभाऊ आखिल मुजावर (रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहापूर परिसरातील महालक्ष्मीनगर येथे एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना समजली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, तेथे रक्ताने माखलेला मोठा दगड आणि मृताचे चप्पल आढळले. पोलिसांनी श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथक यांना पाचारण केले. त्यांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा केले. श्वान पथकाने परिसरातील सोलगे मळ्यापर्यंत माग काढला. हल्लेखोरांनी मृताच्या चेहºयावर दगड घातल्याने चेहरा छिन्नविच्छीन्न बनला होता. त्यामुळे ओळख पटवणे अवघड बनले होते. स्थानिक चौकशी आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास करत पोलिसांनी शाबाज याच्या नातेवाइकांचा शोध घेतला. त्यांना मृतदेहाची ओळख पटली.खुनाचा तपास करण्यासाठी शहापूर पोलिसांसह कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून प्रयत्न सुरू होते. नावे समजल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. प्राथमिक चौकशीत शाबाज व हल्लेखोर हे एकमेकांचे चांगले मित्र होते. सोमवारी (दि. १६) शाबाज याने असिफ व सोहेल यांना सोबत घेऊन इचलकरंजीत आला होता. त्यानंतर काही कारणातून शाबाज याने असिफ याच्या वडिलांना फोन करून वाईट बोलला होता. याचा राग मनात धरून असिफ, सोहेल आणि आखिल यांनी संगनमत करून त्याचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी विदारक चित्रघटनास्थळावर शाबाज याचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मृतदेहाजवळ रक्तांनी माखलेला दगड होता. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात हलविला.

ओळख पटविण्याचे होते आव्हानमृतदेहाचा चेहरा विद्रुप करण्यात आला असल्याने त्याची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, निरीक्षक सतीश सूर्यवंशी यांनी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केली. तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीवरून मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Friends murder man for insulting father over phone.

Web Summary : In Ichalkaranji, three men murdered their friend, Shabaz Sheikh, after he insulted one of their fathers over the phone. The accused have been arrested and are under investigation.