शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेंडा पार्क प्रयोगशाळेने केल्या तीन लाख स्वॅब चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागाने पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचण्यांवर जोर दिला ...

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागाने पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचण्यांवर जोर दिला आहे. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेने मंगळवारी (२७ एप्रिल) तीन लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला.

गतवर्षी कोरोना संसर्ग सुरू झाला असताना येथील स्वॅबचे अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतून येत होते. त्यामुळे अहवाल येण्यास मोठा विलंब लागत होता. त्याचा परिणाम जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर होत होता. यानंतर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुढाकार घेऊन मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये प्रयोगशाळा उभारली. परंतु, स्वॅबची संख्या वाढू लागल्याने आणि सांगली, कोल्हापूसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वॅबही तपासणीसाठी मिरज येथे पाठविले जात असल्याने त्या ठिकाणीही विलंब होऊ लागला.

अखेर पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत या चाचण्या करण्यासाठीची यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी आवश्यक सर्व साहित्य खरेदीची जबाबदारी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यावर देण्यात आली. त्यांनीही सिंगापूरमध्ये आपल्या वैयक्तिक संबंधांच्या जोरावर ही यंत्रणा लवकरात लवकर कोल्हापुरात आणण्याची व्यवस्था केली आणि मे २०२० नंतर या ठिकाणी स्थानिक पातळीवरच चाचण्या सुरू झाल्या. त्यामुळे अहवाल तातडीने मिळू लागले.

चौकट

सध्या अडीच हजारांवर रोज चाचण्या

सध्या दुसऱ्या लाटेच्या कालखंडामध्येही आयसीएमआर यांनी घालून दिलेल्या निकषांनुसार रोज १०८० स्वॅबची चाचणी करण्याच्या सूचना आहेत. परंतु, कोल्हापूरच्या या प्रयोगशाळेत तीन शिफ्टमध्ये रोज अडीच ते तीन हजार स्वॅबची चाचणी केली जात आहे. यासाठी सध्या ११ कंत्राटी तांत्रिक, प्रतिनियुक्तीवरील सहा तांत्रिक, जिल्हा परिषदेने दिलेले सहा डाटा एंट्री ऑपरेटर कार्यरत आहेत. परंतु, हा कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने अधिष्ठाता यांच्याकडे १० तांत्रिकांची मागणी करण्यात आली आहे. सध्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. नीता जांगले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे काम सुरू असून, जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वयासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवि शिवदास यांची नियुक्ती केली आहे.

चौकट

गेल्या आठ दिवसांतील चाचण्या

२० एप्रिल २८४१

२१ एप्रिल २५७२

२२ एप्रिल २५७२

२३ एप्रिल २५७२

२४ एप्रिल २८७४

२५ एप्रिल १९४७

२६ एप्रिल २१८८

२७ एप्रिल २४७३