शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

थोडगे मारहाणप्रकरणी तिघा पोलिसांना ‘झटका’

By admin | Updated: November 2, 2014 23:54 IST

दोन दिवसांत कारवाई : पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी मागविला अहवाल

एकनाथ पाटील-कोल्हापूर -राजकीय हस्तक्षेपामुळे तब्बल पाच महिने लांबणीवर पडलेल्या गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे मारहाण प्रकरणात करवीरच्या तिघा पोलिसांना झटका बसणार आहे. तपास अधिकारी किसन गवळी यांनी केलेल्या तपासामध्ये हे पोलीस दोषी आढळले आहेत. हा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी गवळी यांना दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच दोषी पोलिसांवर निलंबन किंवा तडकाफडकी बदलीची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये गुन्हे शाखेतील (डीबी) तिघा पोलिसांचा समावेश असल्याची चर्चा पोलीस दलात आहे. नातेवाइकांच्या कामासाठी थोडगे हे करवीर पोलीस ठाण्यात १५ जुलैला आले असता त्यांना पोलिसांनी ठाण्याच्या आवारात मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटले. सामाजिक संघटनांनी हे प्रकरण ताणून धरले. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली. या घटनेचे गांभीर्य पाहून अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या प्रकरणाचा तपास किसन गवळी यांच्याकडे दिला. गवळी यांनी थोडगे, त्यांचे सहकारी सुरेश शिंदे, तसेच मारहाणीचा आरोप असलेले संशयित कॉन्स्टेबल सुमित पाटीलसह तिघे पोलीस व प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेले ठाणे अंमलदार, मदतनीस कॉन्स्टेबल, वायरलेस विभागाच्या महिला कॉन्स्टेबल यांचे जबाब घेतले. दरम्यान, मारहाण करणाऱ्या पोलिसांना हे प्रकरण चांगलेच शेकणार असे दिसताच त्यांनी राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न केला. या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण तब्बल पाच महिने लांबणीवर पडले. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक गवळी यांनी केलेल्या तपासामध्ये संबंधित पोलीस दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा चौकशी अहवाल ते पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांना सादर करणार आहेत.घटनाक्रम‘लोकमत’कडून पाठपुरावा‘थोडगे मारहाण प्रकरणाचा अहवाल गायब?’ असे वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. घटनेच्या सुरुवातीपासूनच ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्याने हे प्रकरण तडीस गेले. बंकट थोडगे प्रकरणाचा चौकशी अहवाल दोन दिवसांत माझ्याकडे सादर होईल. त्यानंतर दोषी पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल. - डॉ. मनोजकुमार शर्मा,पोलीस अधीक्षक