कोल्हापुरात उष्माघाताने तिघांचा मृत्यू?, उलटसुलट चर्चा; आरोग्य विभागाने शक्यता फेटाळून लावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 17:00 IST2023-04-19T16:59:47+5:302023-04-19T17:00:34+5:30

साके : बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी दिवसभरात लक्ष्मी शिवाजी ...

Three die of heat stroke in Kolhapur, The Health Department dismissed the possibility | कोल्हापुरात उष्माघाताने तिघांचा मृत्यू?, उलटसुलट चर्चा; आरोग्य विभागाने शक्यता फेटाळून लावली

कोल्हापुरात उष्माघाताने तिघांचा मृत्यू?, उलटसुलट चर्चा; आरोग्य विभागाने शक्यता फेटाळून लावली

साके : बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी दिवसभरात लक्ष्मी शिवाजी पाटील (वय ५४), साताप्पा भाऊ पाटील (वय ५२), जनाबाई विठ्ठल कांबळे (वय ८०) या तिघांचा मृत्यू झाला. नेमका मृत्यू उष्माघाताने का इतर आजाराने, यावरून परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता फेटाळून लावली.

लक्ष्मी शिवाजी पाटील या शेतावर कामासाठी गेल्या होत्या. दिवसभर त्यांनी शेतामध्ये काम केल्यानंतर त्या भरपूर पाणी पिल्यामुळे चक्कर येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

सातापा भाऊ पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दवाखान्यात दाखल करताना उपचारादरम्यानच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जनाबाई विठ्ठल कांबळे यांनाही धाप लागल्यामुळे दवाखान्यात दाखल केले होते. त्यांचाही मृत्यू झाला.

Web Title: Three die of heat stroke in Kolhapur, The Health Department dismissed the possibility