शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या जिवावर तुंबड्या भरणाऱ्यांनी नैतिकता शिकवू नये

By admin | Updated: September 6, 2016 01:32 IST

सतेज पाटील यांचा पलटवार : महाडिक यांचा संघाशी संबंधच काय..?

कोल्हापूर : महादेवराव महाडिक ‘गोकुळ’चे संस्थापक अथवा संचालक नाहीत, मग ते रोज नऊ वाजता संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात कशासाठी बसतात. ‘गोकुळ’चा आधार घेऊन आपला धंदा सुरू ठेवण्यासाठीच ही उठाठेव सुरू असून संघाच्या जिवावर स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, असा पलटवार आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यावर सोमवारी केला. महाडिक यांच्या काळ्या कारनाम्यामुळेच ‘गोकुळ’ बदनाम झाले असून उत्पादकांच्या हितासाठी यापुढेही आपला लढा सुरूच राहील, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. ‘गोकुळ’च्या सर्वसाधारण सभेवरून आमदार पाटील व महाडिक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. ‘शासकीय जागा हडपणाऱ्यांनी ‘गोकुळ’वर बोलू नये’ अशा शब्दांत महाडिक यांनी रविवारी टीका केली होती. त्याला आमदार पाटील यांनी उत्तर दिले, ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणेच ‘महाडिक कंपनी’चा कारभार आहे. आजपर्यंत स्वत: एकही संस्था स्थापन केलेली नाही. उलट ज्या संस्था चांगल्या सुरू आहेत, त्याठिकाणी घुसणे व त्या ओरबडून डबघाईला आणणे हाच त्यांचा उद्योग आहे. ‘गोकुळ’मध्ये ते कंत्राटदार म्हणून घुसले आणि काही वर्षांतच त्यांनी तिथे दुकान थाटले. दिवंगत नेते चुयेकरसाहेब यांची पुण्याई व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची प्रामाणिक साथ मिळाल्यामुळेच महाडिक यांचे दुकान सुरू आहे. जिल्हा परिषदेत अंडी पुरवायचे काम कोणी घेतले? अर्बन बँक समूहातील संचालकांना महापौर करताना महाडिकांनी किती रकमेची कर्जे घेतली? हा इतिहास जिल्ह्णाला माहित आहे. परजिल्ह्णांतून येऊन महाडिक यांनी आजपर्यंत दादागिरी केली आहे. संस्थापकांच्या हाताला धरून संस्थांत घुसायचे आणि काही दिवसांतच संस्थापकांना बाहेर काढून स्वत:चा धंदा सुरू करायचा, ही त्यांची नीती आहे. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे, उपऱ्यांना डोक्यावर चढू देत नाही, हा इतिहास आहे. असे असताना महाडिक यांच्यासारख्या उपऱ्यांची दादागिरी किती दिवस कोल्हापूरकर खपवून घेणार? असे सतेज पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)