शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

तिसऱ्या दिवशी किरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत अंबाबाईचा किरणोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 10:53 AM

Mahalaxmi Temple Kolhapur- करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायण किरणोत्सवात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटांनी महाद्वारपासून प्रवास सुरू केलेली किरणे पाच मिनिटे मूर्तीवर स्थिरावली. आज, सोमवारी किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होण्याची शक्यता आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देतिसऱ्या दिवशी किरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत अंबाबाईचा किरणोत्सव आज पूर्ण होण्याची शक्यता

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायण किरणोत्सवात रविवारी सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. सायंकाळी पाच वाजून १८ मिनिटांनी महाद्वारपासून प्रवास सुरू केलेली किरणे पाच मिनिटे मूर्तीवर स्थिरावली. आज, सोमवारी किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होण्याची शक्यता आहे.मंदिरशास्त्राचा अद‌्भुत नमुना असलेल्या अंबाबाई मंदिरात सध्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळा सुुरू आहे. रविवारी या किरणोत्सवाचा तिसरा दिवस होता. सध्या थंडी सुुरू असल्याने सूर्यास्त लवकर होत आहे; शिवाय किरणे मूर्तीवर येईपर्यंत त्यांची तीव्रताही कमी होत आहे.

अशा वातावरणातही शनिवारी (दि. ३०) देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केलेली किरणे रविवारी पुढचा प्रवास करीत मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली. सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी महाद्वार कमानीतून आत आलेल्या किरणांनी गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरा असे टप्पे पार करीत ६ वाजून १४ मिनिटांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. गुडघ्यापासून गळ्यापर्यंतचा चार मिनिटांचा प्रवास करीत ती ६ वाजून १८ मिनिटांनी लुप्त झाली.रविवार असल्याने मंदिराच्या आवारात भाविकांची मोठी गर्दी होती. सर्व भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेता यावा, यासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आला होता. तसेच ध्वनिक्षेपकावरून या सोहळ्याची माहिती दिली जात होती.किरणांचा प्रवास असा

  • ५ वाजून १८ मिनिटे : महाद्वार रोड ५ वाजून ४६ मिनिटे : गरुड मंडप
  • ६ वाजता : कासव चौक
  • ६ वाजून ७ मिनिटे : पितळी उंबरा
  • ६ वाजून १२ मिनिटे : दुसरी पायरी
  • ६ वाजून १४ मिनिटे : चरणस्पर्श
  • ६ वाजून १५ मिनिटे : गुडघ्यापर्यंत
  • ६ वाजून १८ मिनिटे : गळ्यापर्यंत

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरReligious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर