शिरोळमध्ये चोरट्यांनी 15 दुकाने फोडली, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 13:16 IST2019-12-15T13:15:58+5:302019-12-15T13:16:11+5:30
गणेशनगर ते दत्त कारखाना गेटपर्यंत असणारी विविध दुकाने चोरट्यांनी टार्गेट केली आहेत.

शिरोळमध्ये चोरट्यांनी 15 दुकाने फोडली, तपास सुरू
शिरोळ: शहरात पंधरा दुकाने चोरटयांनी फोडल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. शटर उचकटून एकाचवेळी चोरट्यांनी चोरीचा हा प्रकार केला आहे. पोलीस ठाण्यापासून कांही अंतरावर चोरी झाल्याने चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.
गणेशनगर ते दत्त कारखाना गेटपर्यंत असणारी विविध दुकाने चोरट्यांनी टार्गेट केली आहेत. यामध्ये मेडिकल, किराणा, बेकरी, इलेकॉनिक्स, स्टेशनरी दुकाने चोरट्यांनी फोडली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. कटावणीच्या सहायाने दुकानांचे शटर उचकटण्यात आले असून दुकानातील साहित्य अथवा रक्कम किती गेली. याबाबत पोलीस पंचनाम्यानंतर पुढे येणार आहे.
शनिवारी काही लोक शटरला ग्रीस लावण्यासाठी फिरत होते. त्यांच्याकडून टेहाळणी करुन चोरीचा हा प्रकार घडला, असल्याची चर्चा घटनास्थळी होत आहे.