चोरट्यांनी सोडली नाही सिगारेटची पिशवी... २३ हजार रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 17:06 IST2019-05-25T17:06:00+5:302019-05-25T17:06:58+5:30

मोपेडला लावलेल्या २३ हजार रुपयांची सिगारेट असलेल्या पिशव्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रंकाळा टॉवर परिसरात भरदिवसा घडली.

The thieves did not leave the cigarette bag ... Rs 23 thousand rupees |  चोरट्यांनी सोडली नाही सिगारेटची पिशवी... २३ हजार रुपयांचा फटका

 चोरट्यांनी सोडली नाही सिगारेटची पिशवी... २३ हजार रुपयांचा फटका

ठळक मुद्देलक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली.

चोरट्यांनी सोडली नाही सिगारेटची पिशवी... २३ हजार रुपयांचा फटका

कोल्हापूर : मोपेडला लावलेल्या २३ हजार रुपयांची सिगारेट असलेल्या पिशव्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रंकाळा टॉवर परिसरात भरदिवसा घडली. याबाबत दीपक मारुती जाधव (वय ३५, रा. समृद्धीनगर, पाचगाव) यांनी फिर्याद दिली.

दीपक जाधव हे पानपट्टींना लागणारे साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी (दि. २३) दुपारी ते आपल्या मोपेडवरून सिगारेट विक्री करत रंकाळा टॉवर परिसरात गेले होते. दरम्यान, त्यांनी मोपेडला अडकवलेल्या पिशव्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची २३ हजार रुपये किमतीची सिगारेट पाकिटे होते. ते रंकाळा टॉवर परिसरात एका दुकानात आॅर्डर घेत होते. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने मोपेडला लावलेल्या सिगारेटच्या दोन्ही पिशव्या लंपास केल्या. याची लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली.

Web Title: The thieves did not leave the cigarette bag ... Rs 23 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.