खिडकी उचकटून चोरट्याचा रोकडवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:30 IST2021-09-16T04:30:13+5:302021-09-16T04:30:13+5:30

कोल्हापूर : बेकरीच्या शेडची पाठीमागील खिडकी उचकटून चोरट्याने आतील सुमारे १० हजार ५०० रुपयांची रोकड लांबविली. ही घटना दि. ...

The thief lifts the cash from the window | खिडकी उचकटून चोरट्याचा रोकडवर डल्ला

खिडकी उचकटून चोरट्याचा रोकडवर डल्ला

कोल्हापूर : बेकरीच्या शेडची पाठीमागील खिडकी उचकटून चोरट्याने आतील सुमारे १० हजार ५०० रुपयांची रोकड लांबविली. ही घटना दि. २७ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत खंडेराव राजेंद्र चोपदार (वय ४५ रा.खंडोबा तालीमनजीक, शिवाजी पेठ) यांनी मंगळवारी चोरीची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कसबा बावडा ते शिये दरम्यानच्या रस्त्यावर असणाऱ्या शिये टोल नाकानजीक केदारलिंग बेकरी आहे. या बेकरीला पत्र्याची शेड आहे. अज्ञात चोरट्याने त्या शेडच्या पाठीमागील खिडकी उचकटून आत प्रवेश केला, आतील कौटर टेबलाच्या ड्रॉव्हरमधील १० हजार ५०० रुपयांची रोकड, तसेच विविध बँकांचे एटीएम कार्ड चोरून नेले. या चोरीची तक्रार बेकरी मालक चोपदार यांनी मंगळवारी शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: The thief lifts the cash from the window