‘त्यांनी’ आपल्या कामांची यादी जाहीर करावी, खासदार धनंजय महाडिकांचे संजय मंडलिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 12:29 IST2022-06-14T12:28:08+5:302022-06-14T12:29:00+5:30

मला दुसऱ्याने केलेल्या कामांच्या ठिकाणी जावून फोटो काढण्याची सवय नाही.

They should publish a list of the work they have done in the last two and a half years, MP Dhananjay Mahadik appeal to Sanjay Mandlik | ‘त्यांनी’ आपल्या कामांची यादी जाहीर करावी, खासदार धनंजय महाडिकांचे संजय मंडलिकांना आवाहन

‘त्यांनी’ आपल्या कामांची यादी जाहीर करावी, खासदार धनंजय महाडिकांचे संजय मंडलिकांना आवाहन

कोल्हापूर : मला दुसऱ्याने केलेल्या कामांच्या ठिकाणी जावून फोटो काढण्याची सवय नाही, ज्यांनी आरोप केला त्यांनी गेल्या अडीच वर्षांत त्यांनी केलेल्या कामांची यादी जाहीर करावी. मी त्यात अजिबात हस्तक्षेप करत नाही, असे स्पष्ट आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांचे नाव न घेता केले आहे.

‘नूतन खासदारांनी आमच्या कामांचे श्रेय घेऊ नये,‘ असा टोला मंडलिक यांनी दोनच दिवसांपूर्वी महाडिक यांना लगावला होता. महाडिक म्हणाले, मी नुसता बोलणारा नाही तर काम करून दाखवणारा खासदार आहे. हाच आरोप करणाऱ्यांनी बास्केट ब्रीज म्हणजे हवेतल्या गप्पा असल्याचे सांगितले होते परंतु दुसऱ्याच दिवशी या पुलाचे डिझाईन, अंदाजपत्रक, निविदा निघाल्याचे कागद सादर केले होते. केवळ मला आणि भाजपला श्रेय मिळू नये म्हणून हे काम केले गेले नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये बास्केट ब्रिज होणारच.

मी जरी विरोधी पक्षात असलो तरी भाजपच्या केंद्र सरकारने कधीही पक्षपातीपणा केला नाही. त्यावेळी पाच विमाने सुरू केली. ती आता बंद का आहेत. जादा रेल्वे सुरू केल्या त्या बंद आहेत. आता हे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

Web Title: They should publish a list of the work they have done in the last two and a half years, MP Dhananjay Mahadik appeal to Sanjay Mandlik