शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत प्रभाग रचनेत फारसा बदल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST

इचलकरंजी : मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार द्विसदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह पक्षश्रेष्ठींनाही अनावश्यक ...

इचलकरंजी : मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार द्विसदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह पक्षश्रेष्ठींनाही अनावश्यक कराव्या लागणाऱ्या उठाठेवीपासून दिलासा मिळाला आहे. तसेच इचलकरंजीतील प्रभाग रचनेत फारसा बदल होणार नाही. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात हालचाली गतिमान झाल्या असून, पुढील वाटचालीचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

राज्यातील महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचनेच्या निर्णयाकडे राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते. एक सदस्यीय प्रभाग रचना झाल्यास अपक्षांची संख्या वाढते. तसेच काही इच्छुक उमेदवारांना ‘मॅनेज’ करावे लागते. हा सर्व खटाटोप करताना पक्षश्रेष्ठींना नाकीनऊ येतात. आता द्विसदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाल्याने इचलकरंजीतील स्थिती मागील पानावरून पुढे अशीच राहील, असे दिसते. त्याचबरोबर नगराध्यक्ष निवड मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांतून होणार असल्याने अनेकांना नगराध्यक्षपदाची संधी देता येणार आहे.

गत निवडणुकीत सन २०१६ ला द्विसदस्यीय प्रभाग रचना व जनतेतून नगराध्यक्ष निवड करण्यात आली होती. त्यापूर्वी सन २०११ ला चार सदस्यीय प्रभाग रचना आणि नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवड, सन २००६ ला एकसदस्यीय प्रभाग रचना, नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवड, तर सन २००१ ला त्रिसदस्यीय प्रभाग रचना आणि जनतेतून नगराध्यक्ष निवड झाली होती. यंदा सन २०११ च्या जनगणनेनुसारच प्रभाग रचना होणार असल्याने त्यामध्ये विशेष बदल होणार नाही. मतदारसंख्या वाढल्याने बूथ व मशीनची संख्या वाढू शकते.