शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिकाऱ्यांच्या बदलीशिवाय धरणाचे काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST

आजरा : आजरा- भुदरगडचे प्रांताधिकारी यांची बदली झाल्याशिवाय उचंगी व सर्फनाला धरणाचे काम करू देणार नाही, असा इशारा आज ...

आजरा : आजरा- भुदरगडचे प्रांताधिकारी यांची बदली झाल्याशिवाय उचंगी व सर्फनाला धरणाचे काम करू देणार नाही, असा इशारा आज (सोमवारी) धरणग्रस्तांनी दिला. उचंगी व सर्फनाला धरणग्रस्तांनी आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून हा इशारा दिला.

मोर्चाची सुरुवात शिवाजी पुतळ्यापासून झाली. ‘मोर्चात धरणग्रस्तांचे पुनर्वसन नाकारणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांची बदली झालीच पाहिजे’, ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बाप्पाचे’, ‘नही चलेगी... नही चलेगी... दादागिरी नही चलेंगी’, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्व संजय तर्डेकर, धनाजी गुरव, अशोक जाधव यांनी केले. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत प्रांताधिकारी असंवेदनशील व बेजबाबदारपणाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे धरणग्रस्तांचे पुनर्वसन रेंगाळले आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत वारंवार लेखी व तोंडी माहिती देऊनही जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसन कायद्याचा चुकीचा अर्थ लावून धरणग्रस्तांना पुनर्वसनापासून वंचित ठेवले जात आहे. अशा अधिकाऱ्यांवर धरणग्रस्तांचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी. अन्यथा उचंगी व सर्फनाला धरणाचे काम करू देणार नाही, असा निर्धार संजय तर्डेकर, धनाजी गुरव, अशोक जाधव यांनी व्यक्त केला. याला सर्वांनी हात वर करून मंजुरी दिली.

मोर्चात उचंगी, सर्फनाला धरण संघर्ष समितीचे संजय भडांगे, दत्तात्रय बापट, बाळासाहेब घेवडे, चंद्रकांत सांबरेकर, रणजित सरदेसाई, नामदेव फगरे यांच्यासह धरणग्रस्त सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. मोर्चाच्या वतीने तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन देण्यात आले.

------------------------------------------------------------------

* फोटो ओळी : उचंगी व सर्फनाला धरणग्रस्तांचा आजरा तहसील कार्यालयावर निघालेला मोर्चा. दुसऱ्या छायाचित्रात कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना कॉ. संजय तर्डेकर. क्रमांक : ०८०२२०२१-गड-०८/०९