शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्रचित अभ्यासक्रम लादण्याची घाई नको

By admin | Updated: July 17, 2015 00:06 IST

सोनवणे यांना निवेदन : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षकांची मागणी

कोल्हापूर : पुनर्रचित अभ्यासक्रमांचे संघटना स्वागत करीत आहे. मात्र, हा निर्णय घाईगडबडीने न लादता विद्यार्थीहिताचा प्राधान्याने राज्य शासनाने विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य व्होकेशनल टिचर्स असोसिएशनच्या कोल्हापुरातील शिष्टमंडळाने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वि. भा. सोनावणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात असे म्हटले आहे की, शैक्षणिक सत्र २०१५-१६ पासून राज्यात पुनर्रचित उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, शासनाची तयारी केवळ कागदोपत्री झालेली आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमांचे संघटना स्वागत करीत आहे. मात्र, हा निर्णय घाईगडबडीने न लादता विद्यार्थीहिताचा प्राधान्याने शासनाने विचार करावा. उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम या शैक्षणिक अर्हतेचा समावेश शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांतील विविध पदांच्या सेवानियमावलीत करावा. नवीन अभ्यासक्रमांचा समावेश शिकाऊ उमेदवारी योजनेत करावा. त्याच अभ्यासक्रमात पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची दालने उघडणाऱ्या व्यवसाय शिक्षण विद्यापीठाची स्थापना करावी. त्यानंतरच शासनाने पुनर्रचित अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करावी. शिष्टमंडळात सुनील देसाई, मनोहर कांबरे, अशोक शिरगांवकर, राजेंद्र पाटील, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)समितींकडून सूचना, शिफारसी प्राप्त व्हाव्यातशासननिर्णयानुसार रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमांच्या आढाव्यासाठी कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या दोन्ही समित्यांचे कार्य पूर्ण झालेले नाही. या समित्यांकडून कुठल्याही शिफारशी व सूचना प्राप्त होण्याआधीच घाईगडबडीने पुनर्रचित अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करणे अयोग्य असल्याचे शिष्टमंडळाने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सोनावणे यांना सांगितले.