महाविकास आघाडीत धुसफूस नाही, सर्व काही आलबेल - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 04:00 PM2020-02-22T16:00:41+5:302020-02-22T16:19:31+5:30

सीएए आणि एनआरसीबाबत आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करत असल्याने तेच पुढील निर्णय घेतील, असे सांगून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ठाकरे यांच्या वक्तव्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही अशी पुस्ती जोडली.

There is no fog in development lead, all shaky: Jayant Patil's nirvana | महाविकास आघाडीत धुसफूस नाही, सर्व काही आलबेल - जयंत पाटील

महाविकास आघाडीत धुसफूस नाही, सर्व काही आलबेल - जयंत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देमहाविकास आघाडीमध्ये धुसफूस नाही, सर्व कांही आलबेल : जयंत पाटीलसीएए आणि एनआरसीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील

कोल्हापूर : सीएए आणि एनआरसीबाबत आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करत असल्याने तेच पुढील निर्णय घेतील, असे सांगून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ठाकरे यांच्या वक्तव्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही अशी पुस्ती जोडली. सीएए आणि भीमा कोरेगाव तपासावरुन महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे, कोणत्याही प्रकारची धुसफूस नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.

कोल्हापुरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय ब्राम्हण परिषदेच्या उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी औपचारीक गप्पा मारताना मंत्री पाटील यांनी वरील वक्तव्य केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सीएएचे समर्थन केल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी राज्याचे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख या नात्याने तेच निर्णय घेणार आहेत.

भीमा-कोरेगावप्रकरणी राज्य सरकारकडून समांतर तपास सुरु असल्याबद्दल विचारले असता पाटील यांनी समांतर चौकशीचा निर्णय अजून कागदोपत्री झालेला नाही. झाला असेल तर त्याची मला कांही कल्पना नाही, असे सांगत यापासून अनभिज्ञ असल्याचे सांगितले.

There is no fog in development lead, all shaky: Jayant Patil

महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची धुसफूस नाही. मतभेद तर अजिबात नाहीत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगले काम करत आहोत, असे स्पष्ट करुन पाटील यांनी सरकार भक्कम असल्याचाही निर्वाळा दिला. नवाब मलिक यांच्याबाबतीत विचारलेल्या प्रश्नावर कुणी घोषणा दिली अथवा नाही दिली, यापेक्षा आमच्या पक्षाची भूमिका ठरली आहे, त्यात कधीही बदल होणार नाही, असे स्पष्ट केले.

 

Web Title: There is no fog in development lead, all shaky: Jayant Patil's nirvana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.