शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
5
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
6
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
7
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
8
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
9
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
10
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
11
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
12
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
13
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
14
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
15
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
16
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
17
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
18
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
19
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय विश्रामगृहासाठी पाठपुरावा करण्याची गरज

By admin | Updated: July 7, 2015 21:12 IST

जयसिंगपूर शहर : लोकप्रतिनिधींबरोबर शासकीय यंत्रणेची उदासीनता

संदीप बावचे- जयसिंगपूर -जिल्ह्याच्या पूर्वभागातील मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयसिंगपुरात शासकीय विश्रामगृह होणे गरजेची बाब बनली आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील मध्यवर्ती केंद्र असलेल्या या शहरात शासकीय विश्रामगृहाची सुविधा अनेक वर्षांपासून केवळ चर्चा म्हणूनच राहिली आहे. लोकप्रतिनिधींची मागणी आणि शासकीयपातळीवरील ठोस पाठपुरावा झाला तरच हे विश्रामगृह अस्तित्वात येणार आहे.आखीव-रेखीव म्हणून जयसिंगपूर शहराची ओळख आहे. शाहू महाराजांनी आपले जनक पिता जयसिंग महाराज यांच्या नावाने व्यापारपेठ म्हणून वसवलेले शहर आज मॉडेल शहर म्हणून नावारूपास येत आहे. सांगली - कोल्हापूर महामार्गावरील केंद्र असलेल्या या शहरात शासकीय विश्रामगृहाची गरज बनू पाहत आहे. तालुक्यात शिरोळ येथे शासकीय विश्रामगृह आहे. या ठिकाणी मर्यादा येत आहे. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी हे विश्रामगृह गरजेचे आहेच; पण जयसिंगपुरातदेखील विश्रामगृह तितकेच महत्त्वाचे आहे. कुरुंदवाड याठिकाणी असलेले विश्रामगृह बंद अवस्थेत आहे. जयसिंगपूर शहरात बहुतांश शासकीय कार्यालये आहेत. न्यायालये, पोलीस उपअधीक्षक कार्यालय, रेल्वेस्थानक, सहायक निबंधक कार्यालय, आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक पंढरी म्हणून जयसिंगपूरची प्रामुख्याने ओळख आहे. यापूर्वी विश्रामगृह होण्याबाबत मागणी झाली होती, त्यानुसार रेल्वेस्थानकाजवळील जागा आरक्षितही करण्यात आली होती. मात्र, पाठपुरावा झाला नसल्यामुळे ही मागणी अस्तित्वात आली नाही. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील केंद्र असलेल्या या शहरात विश्रामगृहाची गरज भासू लागली आहे. जिल्ह्याच्या पूर्वभागातील या मोठ्या शहरात विश्रामगृह होण्यासाठी लोकप्रतिनिधींबरोबर शासकीय यंत्रणेच्या पाठपुराव्याची गरज आहे. खासगी ठिकाणी सोयतालुक्यामध्ये सर्व शासकीय कार्यालये व उच्च महाविद्यालये आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवणारे प्रशासकीय व शैक्षणिक अधिकारी येत असतात. शिरोळ येथे मर्यादित विश्रामगृह असल्यामुळे नाइलाजास्तव खासगी ठिकाणी राहण्याची सोय करावी लागते. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर हे सांगली-कोल्हापूर मार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी आहे. याठिकाणी विश्रामगृहाच्या आरक्षित जागेबाबत माहिती घेऊन शासकीय विश्रामगृह होण्याबाबत प्रस्ताव ठेवून पाठपुरावा करू.- उल्हास पाटील, आमदार