शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज बाजार समितीसाठी दुरंगी लढत

By admin | Updated: July 12, 2015 00:22 IST

१२६ जणांची माघार : १८ जागांसाठी ५३ उमेदवार; २ आॅगस्टला होणार मतदान

गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी सर्व गटांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध शिवसेना, स्वाभिमानी व काँग्रेस युतीचे श्री शिव-शाहू शेतकरी परिवर्तन आघाडी यांच्यात दुरंगी सामन्याचे चित्र माघारीनंतर शनिवारी स्पष्ट झाले. उमेदवारी दाखल केलेल्या १७९ पैकी १२६ जणांनी माघार घेतली. १९ जागांपैकी हमाल-तोलारी गटाची एक जागा बिनविरोध झाली. उर्वरित १८ जागांसाठी ५३ उमेदवार रिंगणात आहेत. २ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. सत्ताधारी आघाडीत गडहिंग्लजमधील आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रकाशराव चव्हाण, अ‍ॅड़ श्रीपतराव शिंदे व हत्तरकी गट आजऱ्यातील चराटी, शिंपी व आपटे गट, चंदगडमधील नरसिंगराव भरमूअण्णा व गोपाळराव गट आणि कागलमधील आमदार हसन मुश्रीफ, विक्रमसिंहराजे गट व मंडलिक गट एकत्र आले आहेत. विरोधी आघाडीत शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बंटी पाटील गट व शहापूरकर गट एकत्र आले आहेत. सत्ताधारी आघाडीतून विद्यमान ८ संचालक पुन्हा नशीब आजमावत आहेत. त्यापैकी हमाल -तोलारी गटातून बाबूराव चौगुले हे बिनविरोध निवडून आले आहेत. सत्ताधारी आघाडीतून विद्यमान सभापती अशोक चराटी, उपसभापती चंद्रशेखर पाटील, संचालक उदयकुमार देशपांडे, नामदेव नार्वेकर, चंद्रकला बामुचे, विश्वनाथ करंबळी व नारायण बांदिवडेकर यांच्यासह धनाजी काटे, रवींद्र शेंडुरे, गोविंद सावंत, संभाजी सुतार, किरण कांबळे, जयवंत शिंपी, दयानंद नाईक, जितेंद्र शिंदे, सारिका चौगुले, सुमन लकडे हे रिंगणात आहेत. विरोधी आघाडीतून संदीप पाटील, अशोक पाटील, अशोक महाडिक, एकनाथ नार्वेकर, अंकुश गवस, महादेव वांद्रे, दशरथ पारदे, उत्तम नाईक, भीमराव कुंभार, सुनंदा पाटील, प्रकार खांडेकर, फुलाजी खैरे, सूर्यकांत देसाई, सरिता कांबळे, राचय्या स्वामी व परेश पोतदार हे रिंगणात आहेत.