शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

क्षीरसागर-वरपे वाद: कोल्हापूर पोलिसांच्या भूमिकेबद्दल उलटसुलट प्रश्न, पोलिस अधीक्षक म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 13:21 IST

वरपे यांची फिर्याद नोंदवून घेतली नसल्याने उलटसुलट प्रश्न

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांचे शेजारी राजेंद्र ज्ञानदेव वरपे यांच्यातील वादाच्या चौकशीत पोलिसांवर कोणताही दबाव नाही, असे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी (दि. १३) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दोन्हीकडील तक्रार अर्जानुसार प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.शनिवार पेठेतील शिवगंगा संकुलाच्या टेरेसवर शुक्रवारी (दि. ८) सुरू असलेल्या जेवणावळीवरून माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचे शेजारी राजेंद्र वरपे यांच्यात वाद झाला होता. क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाने मारहाण केल्याची तक्रार वरपे यांनी केली होती, इमारतीमधील रहिवासी वरपे यांचा तक्रार अर्ज घेतला. वरपे यांची फिर्याद नोंदवून घेतली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल उलटसुलट प्रश्न उपस्थित केले जात होते. याबाबत विचारणा केली असता, या वादाच्या चौकशीत पोलिसांवर कोणताही दबाव नसल्याचे अधीक्षक पंडित यांनी स्पष्ट केले. दोन्ही अर्जांची चौकशी सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविले जात आहेत. दोन जबाब नोंदविले आहेत. इतरांचेही जबाब नोंदविले जातील. लवकरच इमारतीमधील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले जाईल. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर दोषींवर पुढील कारवाई होईल, अशी माहिती त्यांनी दिली.खासगी सावकारांविरोधात तक्रारी द्याविनापरवानगी खासगी सावकारी सुरू असल्याच्या तक्रारी कानावर येतात. परंतु, लेखी तक्रारी येत नाहीत. खासगी सावकारांनी अतिरिक्त व्याज वसुली केल्याच्या तक्रारी नागरिकांनी द्याव्यात. त्यानुसार खासगी सावकारांवर तातडीने कारवाया केल्या जातील, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर