Hasan Mushrif: लोकसभेत जाण्याचा विचार नाही, माजी मंत्री हसन मुश्रीफांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 01:48 PM2022-07-21T13:48:20+5:302022-07-21T13:48:53+5:30

खासदार संजय मंडलिक यांचे मन वळवण्यात आमदार सतेज पाटील यांना अपयश आले

There is no intention to go to Lok Sabha, former minister Hasan Mushrif clarified | Hasan Mushrif: लोकसभेत जाण्याचा विचार नाही, माजी मंत्री हसन मुश्रीफांनी केलं स्पष्ट

Hasan Mushrif: लोकसभेत जाण्याचा विचार नाही, माजी मंत्री हसन मुश्रीफांनी केलं स्पष्ट

googlenewsNext

कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन चर्चेला उधान आले होते. राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ हेच आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार मंडलिक यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगू लागल्या होत्या. यावर माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफांनी आपले मत व्यक्त केलं आहे.

कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुश्रीफांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, मी विधानसभेसाठीच इच्छुक आहे. लोकसभेवर जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंडलिकांचे मन वळवण्यात सतेज पाटलांना अपयश

यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की, खासदार संजय मंडलिक यांनी अशी भुमिका घेऊ नये. याबद्दल आम्ही त्यांना बोललो होतो असे सांगितले. यावर त्यांचे मन वळवण्यात अपयश आले का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता मुश्रीफ यांनी मला नाही आमदार सतेज पाटील यांना अपयश आले अशी मिश्किल टिप्पणी केली.

तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालून गेलेले असेल

लोकसभा निवडणूक अजून लांब आहे. तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालुन गेलेले असेल. तेव्हा आता लोकसभा निवडणुकी बद्दल बोलणे घाईचे ठरेल. आमचा पक्ष जो आदेश देईल. तशी आमची भुमिका असेल. माझी पुन्हा आमदार होण्याचीच इच्छा आहे असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Web Title: There is no intention to go to Lok Sabha, former minister Hasan Mushrif clarified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.