शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

कोल्हापूर ‘झेडपी’च्या रणांगणात महायुती मोठ्या पेचात, फुटीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:14 IST

तुलनेत ‘इंडिया’ आघाडी एनजिनसी

कोल्हापूर : जिल्ह्यात दहाही महायुतीचे आमदार बनल्यामुळे, त्यातही शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे दोन मंत्री अशा परिस्थितीत एकदम भक्कम असलेल्या महायुतीमध्येचजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या स्थितीत चंदगड आणि भुदरगड तालुक्यात महायुती विस्कटण्याची शक्यता असून, यामध्ये वरिष्ठांनी ‘आदेश’ दिला तरच काही तरी मिटू शकते असे चित्र आहे.२०१७ साली भाजपचा पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी पक्षाने कंबर कसली होती. अशातच शौमिका महाडिक यांचे नाव पुढे आल्यामुळे सत्तासंघर्षाला वेगळीच धार आली. या नावामुळेच मग राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या एका पठ्ठ्यानेही महाडिक यांना मतदान केले तर काहीजण चक्क गैरहजर राहिले होते आणि शिवसेनेतही फूट पडली होती. महाविकास आघाडीचे तत्कालीन नेते हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना पहिल्या टप्प्यात जे करता आले नाही ते त्यांनी अडीच वर्षांनंतर सत्तांतर घडवून करून दाखवले.

आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मुश्रीफ महायुतीचे एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी जरी महायुती म्हणून एकत्रित लढणार असे सांगितले असले तरी चंदगड तालुक्यात भाजपला पाठिंबा दिलेले विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यातच लढत रंगू शकते. भुदरगडमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि उद्धवसेनेत असलेले परंतु राष्ट्रवादीसोबत कार्यरत माजी आमदार के. पी. पाटील यांच्यातही उभा दावा आहे.कागल तालुक्यात राष्ट्रवादीचे मुश्रीफ, भाजपचे संजयबाबा घाटगे आणि शिंदेसेनेचे संजय मंडलिक यांच्यात यशस्वी वाटणी झाली तर येथे अडचण येणार नाही. आजरा तालुक्यात मतदारसंघनिहाय वेगळे चित्र दिसू शकते किंवा विद्यमान आमदारांना जागा असेही सूत्र पुढे येऊ शकते.करवीर, हातकणंगले, शिरोळ या तीन तालुक्यात महायुती एकत्र राहू शकेल असे दिसते. परंतु, सत्तारूढांकडेेच इच्छुकांचा अधिक ओढा असल्याने अडचणी अधिक आहेत. गडहिंग्लजमध्ये विधानसभानिहाय चित्र बदलू शकते. पन्हाळा, शाहूवाडीत जनसुराज्य विरुद्ध उद्धवसेना असेच लढतीचे चित्र राहणार आहे.

मावळत्या जिल्हा परिषदेतील बलाबल

  • काँग्रेस - १४
  • भाजप - १४
  • राष्ट्रवादी - ११
  • शिवसेना - १०
  • जनसुराज्य - ०६
  • ताराराणी पक्ष आघाडी (महाडिक) - ०३
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना - ०२
  • शाहू आघाडी राधानगरी (आबिटकर) - ०२
  • युवक क्रांती आघाडी (कुपेकर) - ०२
  • कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी (आवाडे) - ०२
  • अपक्ष - ०१
  • एकूण - ६७ 

तुलनेत ‘इंडिया’ आघाडी एनजिनसीमहायुतीच्या तुलनेत ‘इंडिया आघाडी’ एकजिनसीपणाने या निवडणुकांना सामोरे जाऊ शकते. कारण सध्या आमदार सतेज पाटील हे या आघाडीचे एकमेव मोठे आणि जिल्हाभर सक्रिय नेते आहेत. ते आघाडीतील इच्छुकांचे समाधान करून एकत्रित आणू शकतात. त्यामुळे महायुतीच्या तुलनेत इंडिया आघाडीस धुसफूस कमी असेल असे दिसते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक 2024Mahayutiमहायुती