शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

भूत असते का? कोल्हापूरचा सर्पमित्र अमावास्येला दोन रात्री स्मशानात राहिला; सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 4:20 PM

eradication of superstition: या जगात भूतखेत नाही तर गैरसमजुतीतून मनावर बिंबवलेले भूताटकीचा पगडा अंधश्रध्देला खतपाणी घालत असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

- सरदार चौगुले

लोकमत न्यूज नेटवर्क,

पोर्ले तर्फ ठाणे : अंत्यसंस्कार, रक्षाविसर्जन, अमावश्या आणि पोर्णिमेच्या रात्री स्मशानभूमीत जाणं अपशकुन मानले जाते.शिवाय करणीच्या अधिन असणाऱ्या स्मशानभूमीवर अंधश्रध्देचा पगडा असल्याने भूताचे घर म्हणून स्मशानभूमीची ओळख आहे.या सर्व गैरसमजुतीला छेद देण्यासाठी पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील स्मशानभूमीत सर्पमित्र दिनकर चौगुले यांनी अमावस्येच्या दोन रात्री वस्ती करून भूतांची शोध घेताना कोणतीही भीतीदायक घटना अनुभवायला मिळाली नसल्याचे ठासून सांगितले. या जगात भूतखेत नाही तर गैरसमजुतीतून मनावर बिंबवलेले भूताटकीचा पगडा अंधश्रध्देला खतपाणी घालत असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

 समाजातील अनेक चालीरूढी, परंपरांच्या माध्यमातून लोकांच्या मनात अंधश्रध्देचे भूत मानगुठीवर बसलेले आहे.ते उतरविण्यासाठी दिनकर चौगुले यांनी “भूतांचा शोध” असा ‘अंधश्रध्दा निर्मुलन’ प्रबोधनात्मक उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाचं भाग म्हणून त्यांनी भूताटकीचा वावर आणि शापित जागेवर वस्ती केली; पण त्यांना भूत काही दिसले नाही. त्यांनी गतवर्षी पोहाळे तर्फ आळते येथील स्मशानभूमीत मुलांच्या सहलीचे आयोजन करून त्यांच्या मनातील भूताटकी काढून टाकली होती. असे अनेक धाडसी प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी भूताचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या स्मशानभूमीकडे मोर्चा वळवला. त्यांनी अमावस्येच्या शुक्रवारी आणि शनिवारची दिवसरात्र राहून भूतांबाबत असणाऱ्या गैरसमजुतीचा शोध घेतला. ना भूत दिसले, ना कोणत्याही मायावी शक्तीचा त्रास झाला. त्यांनी भूत दाखविणाऱ्याला २५ लाख रूपये बक्षीस जाहीर करत मांत्रिक बुवांना आवाहन केले आहे.

अमावस्येच्या रात्रीचे औचित्य साधून त्यांनी स्मशानभूमीत सॅलेट पार्टीचे आयोजन केले होते. त्यांना आपले मित्रमंडळी आणि गावातील लोकांना या पार्टीचे निमंत्रण दिले होते. स्मशानभूमीत रक्षाविसर्जनवेळी ठेवलेला नैवेद्याला कोणी हात लावत नाही. स्लॅट पार्टीत अनेकांनी फळांचा आणि वरण भाताचा स्वाद घेऊन अनेक चालीरूढींना छेद दिला.

अंध्दश्रध्देला आणि करणीला जेथून  सुरूवात होते तिच जागा दिनकररावांनी निवडून अनेकांच्या कपाळावर आट्ट्या निर्माण केल्या होत्या. गावाच्या ग्रामपंचायतीपासून अंत्ययात्रेला सहवाद्य सुरूवात केली. त्यांनी अंतयात्रा सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला कोल्हापूर लहरी फेटे बांघून अंतयात्रा लक्षवेधी बनवली होती.जीवनरक्षक दिनकर कांबळे यांनी आतापर्यंत जीवाची पर्वा न करता साडेतीन हजार प्रेतांची विल्हवाट लावली. त्यातील एका आत्म्याने त्यांना त्रास दिला नाही. म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची निनड केली. त्यांनी स्मशानभूमीत उपस्थितांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. तसेच त्यांना आलेल्या वाईट प्रसंगाचे अनुभव कथन करताना अनेकांच्या अंगावर शहारे उभारत होते.

प्रमुख पाहुणे दिनकर कांबळे यांची तिरडीवरून अंतयात्रा काढण्याचे नियोजन दिनकरांनी केले होते. समाजातील काही लोकांनी या प्रक्रियेला विरोध केला. जिवंत माणसांची अंतयात्रा काढणे चुकीचे असल्याचे काही हितचिंतकानी सांगितले. त्यांनी कार्यक्रमात बदल केला. तिच मिरवणूक त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॅालीतून काढली. 

स्मशानभूमीत स्लॅट पार्टी आणि वरणभाताचे भोजन घालण्याचा पहिलाचं जिल्ह्यातील प्रयोग आहे.यापुढे “शोध भुताचा” यावरती पुस्तक लिहिण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विज्ञान युगात अनेक देवदेवर्षी आणि मांत्रिक माणसात शिरलेले भूत उतरविण्याचा मायावी प्रयोग करत आहे. मी त्यांना असे आवाहन करतो की त्यांनी मला भूत दाखवले तर मी २५ लाखाचे बक्षिस देतो. जर नाही दाखवले तर त्यांच्याकडून घेतली जाणारी पाच हजारची डिपॅाजीट परत केली जाणीर नाही.- सर्पमित्र दिनकर चौगुले, पोर्ले तर्फ ठाणे ता.पन्हाळा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर