शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
3
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
4
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
5
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
6
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
7
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
8
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
9
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
10
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
11
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
12
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
13
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
14
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

नवे निर्बंध नाहीत, आहे त्यांचीच कडक अंमलबजावणी, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 12:57 PM

collector Office Kolhapur News- कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या आणि राज्यातील बुलढाणा, अमरावतीसह चार जिल्ह्यांत संचारबंदी लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधाच्या नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश काढले आहेत. यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोणतेही नवे निर्बंध न लावता, आहेत त्याच जुन्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रसंगी दंडात्मक कारवाई करा; पण हयगय नको, असे बजावल्याने यंत्रणा गतिमान झाली आहे.

ठळक मुद्देनवे निर्बंध नाहीत, आहे त्यांचीच कडक अंमलबजावणी, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

कोल्हापूर : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या आणि राज्यातील बुलढाणा, अमरावतीसह चार जिल्ह्यांत संचारबंदी लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधाच्या नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश काढले आहेत. यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोणतेही नवे निर्बंध न लावता, आहेत त्याच जुन्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रसंगी दंडात्मक कारवाई करा; पण हयगय नको, असे बजावल्याने यंत्रणा गतिमान झाली आहे.मुख्यमंत्र्यांसमवेत व्हीसीद्वारे राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (दि. १६) झाल्यानंतर बुधवारी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना प्रतिबंधक आदेशाच्या अंमलबजावणीचे परिपत्रक काढले आहे. मिशन बिगिन अंतर्गत जे नियम लावले होते, त्यांचीच अंमलबजावणी पुन्हा एकदा करण्यात येणार आहे. त्याची प्रत गुरुवारी जिल्हाधिकारी, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस विभाग यांच्या हातात पडल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनासाठीची यंत्रणा गतिमान करण्यास सुरुवात झाली आहे.पुन्हा टाळेबंदी करण्याची वेळ येऊ नये असे वर्तन सार्वजनिक आणि वैयक्तिक पातळीवर ठेवावे, असे सांगताना कोरोनाची परिस्थिती गंभीर रूप धारण करील हे गृहीत धरूनच प्रशासकीय यंत्रणांनी कामाला लागावे, असे आयुक्त राव यांनी आदेशात म्हटले आहे. मास्क वापराची सक्ती करतानाच सॅनिटायझर, साबणाने हात धुणे, सोशल डिस्टन्स ठेवणे हे पाळावेच लागणार आहेत. यात हयगय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.हे नियम पाळावेच लागणार१. कार्यालयात व बाहेर फिरताना मास्क वापरणे बंधनकारक.२. सरकारी कार्यालयातील उपस्थिती व खबरदारीच्या उपाययोजना यांचा विसर नको.३. मंगल कार्यालये, सांस्कृतिक सभागृह, उद्यान, स्टेडियम येथे पथकांद्वारे तपासणी.४. राजकीय सभा, मोर्चे, मिरवणुका, लग्नसमारंभ येथे १०० लोकांचीच उपस्थिती ठेवा.५. हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृहात मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचा अवलंब आवश्यक.६. कोचिंग क्लासेसमध्येही मास्क व सोशल डिस्टन्स बंधनकारक.७. खासगी दवाखान्यांतील सर्दी, तापाच्या रुग्णांना कोविड टेस्ट बंधनकारक.८. महापालिका, नगरपालिकांनी कंटेन्मेंट झोन निश्चित करावेत.९) वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोविड केअर सेंटर सुसज्ज ठेवा.१०) सुपर स्प्रेडर रोखण्यावर भर द्यावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर