शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:51 PM

सरकार मुर्दाड झाले आहे, अर्ज-विनंत्यांची भाषा त्यांना कळत नाही. त्यांचे देव असलेले अमित शहा २४ रोजी कोल्हापुरात येत आहेत. हा दौरा सुरळीत पार पडावा, असे सरकारला वाटत असेल तर दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थकीत उस आणि विजेच्या बिलांचा हिशेब द्यावा; नाही तर मुख्यमंत्र्यांसह येणाऱ्या अमित शहांना कोल्हापुरात पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

ठळक मुद्दे... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाहीखासदार राजू शेट्टींचा इशारा: ऊस आणि विजेचा बिलांचा हिशेब पूर्ण करा

कोल्हापूर : सरकार मुर्दाड झाले आहे, अर्ज-विनंत्यांची भाषा त्यांना कळत नाही. त्यांचे देव असलेले अमित शहा २४ रोजी कोल्हापुरात येत आहेत. हा दौरा सुरळीत पार पडावा, असे सरकारला वाटत असेल तर दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थकीत उस आणि विजेच्या बिलांचा हिशेब द्यावा; नाही तर मुख्यमंत्र्यांसह येणाऱ्या अमित शहांना कोल्हापुरात पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचा सर्वपक्षीय शेतकरी मेळावा गुरुवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला. मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार शेट्टी म्हणाले, सरकारने आतापर्यंत किती वेळा आश्वासने दिली आणि किती वेळा मोडली याची मोजदाद करणे आम्ही सोडून दिले आहे.

शेतकऱ्यांविषयी नुसता खेळखंडोबा सुरू असल्यानेच रस्त्यावर उतरावे लागत आहे. उसाच्या एफआरपीत २०० रुपयांची वाढ झाल्याचे सांगणारे सरकार एफआरपीचा बेस वाढवून शेतकऱ्यांची फसवणूक करते. हेच सरकार एफआरपी अधिक २०० रुपये पहिली उचल देऊ म्हणते आणि प्रत्यक्ष देण्याची वेळ आल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते.

विजेच्या बाबतीतही गेली साडेचार वर्षे नुसतीच आश्वासने दिली जात आहेत. सत्यशोधन समितीचा अहवाल स्वीकारण्याचे नैतिक धाडसही सरकारकडे राहिलेले नाही. वीज थकबाकीची किती रक्कम शेतकरी देणे लागतो आणि सरकार किती याचा हिशेब द्या, ते जमत नसेल तर शेतकऱ्यांकडे पैसे मागण्याचा नैतिक अधिकारही ‘महावितरण’ला राहिलेला नाही.२१ चे चक्का जाम आंदोलन ताकदीने करावीज व एस.टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सरकार हतबल होते. मग शेतकरी इतके वेळा रस्त्यावर उतरतात, तरीही सरकार का हतबल होत नाही, याचा शेतकऱ्यांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्यात मेळ नसल्यानेच सरकार त्याचा गैरफायदा उठवीत आहे. हे होऊ द्यायचे नसेल तर २१ रोजीच्या कोल्हापुरात पंचगंगा पुलावरील महामार्गावर चक्का जाम आंदोलनात ताकदीने उतरा, असे आवाहन खासदार शेट्टी यांनी केले.सरकार आहे की दलाल?विजेच्या विक्रीदरात भराभर वाढ होत असताना कारखान्यांनी तयार केलेल्या विजेचे खरेदीदर मात्र कमी होत आहेत, यामागचे गौडबंगाल काय, अशी विचारणा करीत खासदार शेट्टी यांनी कमी दराने वीज घेऊन ती जास्त दराने विकणारे हे सरकार आहे की दलाल, हे आधी सरकारने जाहीर करावे, असे खुले आव्हान दिले. शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडणाऱ्यांनी वीजचोऱ्या करणाऱ्यांना आधी पकडावे. वीजचोऱ्या करणारेच आमदार आणि मंत्रीही झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर