अंबपजवळ दोन कारखान्यांत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST2021-07-02T04:18:02+5:302021-07-02T04:18:02+5:30

पेठवडगाव : अंबपजवळ दोन कारखान्यांतील लोखंडी अ‍ॅगल, पिंग आयर्न, सी आय स्क्रॅप असा एक लाख ६० हजारांचा ...

Theft at two factories near Ambap | अंबपजवळ दोन कारखान्यांत चोरी

अंबपजवळ दोन कारखान्यांत चोरी

पेठवडगाव : अंबपजवळ दोन कारखान्यांतील लोखंडी अ‍ॅगल, पिंग आयर्न, सी आय स्क्रॅप असा एक लाख ६० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. चोरीची घटना गुरुवारी उघडकीस आली. याची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे.

याबाबत विद्या सुभाष पाटील (रा. अंबप), उदयसिंग हणमंतराव रजपूत यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, अंबप येथे पाटील यांची फाल्कन मेटाॅलिक्स कंपनी आहे. या कंपनीचे शेड तयार करण्यासाठी लोखंडी अ‍ॅगल, बार, प्लेटस असे ६० हजार रुपये किमतीच्या आणल्या होत्या. हे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

दरम्यान, अंबपवाडी रस्त्यावर रजपूत यांची हनुमान मेटल्स हा स्पेअर पार्ट तयार करण्याचा कारखाना आहे. येथील एक लाख पाच रुपये किमतीचे सात टन पिग आयर्न, सी आय स्क्रॅप अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेला. तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस नाईक अमरसिंह पावरा करीत आहेत.

Web Title: Theft at two factories near Ambap