उचगावात पावणेचार लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:27 IST2021-04-10T04:25:29+5:302021-04-10T12:27:48+5:30

Crimenews Kolhapur-गांधीनगर मुख्य रस्त्यावर उचगाव हद्दीत पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने टेरेसवरील लोखंडी दरवाजा उचकटून दुकानात प्रवेश केला व दुकानातील कँश काऊंटरमधील ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Theft of Rs 54 lakh in Uchgaon | उचगावात पावणेचार लाखांची चोरी

उचगावात पावणेचार लाखांची चोरी

ठळक मुद्देउचगावात पावणेचार लाखांची चोरीघटना सीसीटीव्हीमध्ये कैद

उचगाव- गांधीनगर मुख्य रस्त्यावर उचगाव हद्दीत पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने टेरेसवरील लोखंडी दरवाजा उचकटून दुकानात प्रवेश केला व दुकानातील कँश काऊंटरमधील ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

गांधीनगर मुख्य रस्त्यावर उचगाव हद्दीत तनवाणी कॉर्नरजवळ केसवानी हॉस्पिटलच्या समोर सहेज ट्रेडर्स नावाचे गोळ्या-बिस्किट विक्रीचे होलसेल दुकान आहे. दुकानाचे मालक. ओचवानी हे नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने टेरेसवरील लोखंडी दरवाजा उचकटून दुकानात प्रवेश केला व दुकानातील कँश काऊंटरमधील ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दु

कान मालक शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. अमन ओचवानी यांनी गांधी नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून चोरी झाल्याची माहिती दिली. घटना समजताच गृह उपाधीक्षक सुनीता नाशिककर, गांधी नगरचे सपोनि दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकास पाचारण केले. दुकानाच्या मागील बाजूस असणाऱ्या शेतामध्ये माग काढत तेथेच घुटमळत राहिले. चोरटा चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाला असून, नाशिककर यांनी गांधी नगर पोलीस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मलमे करीत आहेत.

Web Title: Theft of Rs 54 lakh in Uchgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.