शाहूपुरी व्यापारी पेठेत ८४ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:44 IST2020-03-17T16:42:49+5:302020-03-17T16:44:05+5:30

कोल्हापूर येथील शाहूपुरी व्यापारी पेठेतील एस. के. डेव्हलपर्स येथील साईटवर पत्र्याच्या बंद खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतील सुमारे ८४ हजार ४०३ रुपयांचे प्लंबिंगचे साहित्य चोरून नेले. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात बाहुबली भूपाल चौगुले (रा. वळिवडे, ता. करवीर) यांनी तक्रार दिली आहे.

Theft of 3,000 in Shahupuri Merchant Peth | शाहूपुरी व्यापारी पेठेत ८४ हजारांची चोरी

शाहूपुरी व्यापारी पेठेत ८४ हजारांची चोरी

ठळक मुद्देशाहूपुरी व्यापारी पेठेत ८४ हजारांची चोरीप्लंबिंग साहित्याची चोरी : बांधकामावरील शेडचे कुलूप तोडले

कोल्हापूर : येथील शाहूपुरी व्यापारी पेठेतील एस. के. डेव्हलपर्स येथील साईटवर पत्र्याच्या बंद खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतील सुमारे ८४ हजार ४०३ रुपयांचे प्लंबिंगचे साहित्य चोरून नेले. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात बाहुबली भूपाल चौगुले (रा. वळिवडे, ता. करवीर) यांनी तक्रार दिली आहे.

एस. के. डेव्हलपर्स या कंपनीचे कोल्हापुरात शाहूपुरी व्यापारी पेठेत बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी साहित्य ठेवण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले आहे. शनिवार ते रविवार दरम्यान अज्ञात चोरट्याने या पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत ठेवलेले प्लंम्बिंग व इलेक्ट्रीकच्या साहित्यापैकी नामवंत कंपनीचे प्लंम्बिंगचे प्लॅश व्हॅल्यूचे २३ नग, १८ डिव्हायडर असे एकूण ८४ हजार ४०३ रुपये किमतीचे तीन बॉक्स अज्ञाताने चोरून नेले.

याबाबत घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट देऊन पहाणी केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे.
 

 

Web Title: Theft of 3,000 in Shahupuri Merchant Peth