शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा म्हणते १६५ कोटींची थकबाकी; कोल्हापूर महापालिकेचा ३० कोटींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:01 IST

कायदा धाब्यावर बसविला..

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता पंचगंगा नदीतून उपसा केलेल्या पाण्याची थकबाकी १६५ कोटी असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे, तर महापालिका पाणीपुरवठा विभागाने तडजोडीअंती ३० कोटींचा थकबाकी द्यायचे ठरले होते, असा दावा केला आहे.शुक्रवारी पाणीपुरवठा खंडित करण्याला २०१९ ते २०२५ या सालातील पाणीपट्टी आकारणी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या काळात महापालिका व जलसंपदा विभागाने करार केला नव्हता. आता तो करण्यात आला आहे. ७६.६४ मिलियन क्युबिक मीटर इतका नदीतून उपसा करण्याचा कोटा दिला होता. परंतु महापालिका पाणीपुरवठा विभागाने ५५ मिलियन क्युबिक मीटर उपसा केल्याचा जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी दावा केला आहे.जेवढे पाणी उपसा केले आहे, तेवढीच पाणीपट्टी आकारा अशी भूमिका महापालिकेने घेतली, तर जेवढा मंजूर कोटा आहे तेवढी पाणीपट्टी जलसंपदा विभागाने आकारली आहे. परंतु ही आकारणी महानगरपालिकेने मान्य केलेली नाही. यातून तोडगाच न निघाल्यामुळे थकबाकी वाढत गेली. तरीही आतापर्यंत १४ कोटी ४० लाख रुपये जलसंपदाकडे भरले आहेत. दहा कोटी यावर्षी दिले जाणार आहेत.जलसंपदा विभागाकडून महापालिकेला घरफाळ्याची सात कोटी २४ लाख रुपये तर पाण्याची थकबाकी ३ कोटी ३३ लाख रुपये येणे आहे. ही रक्कमही समायोजित करा, असे आम्ही जलसंपदा विभागाला सांगितले. परंतु त्यांनी ऐकले नाही, असे घाटगे यांनी सांगितले.

कायदा धाब्यावर बसविला..

महापालिकेला १६५ कोटी रुपये जलसंपदा विभागाला द्यावे लागतात. थकबाकी भरण्याबाबत महापालिकेला वारंवार नोटिसा देऊन, समक्ष भेटूनही त्यांनी रक्कम भरली नाही. तसेच कोणताही सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला नाही. मार्चअखेर असल्याने मंत्र्यांच्या सूचनेनुसार थकबाकीसाठी कारवाई करावी लागली. तर कायदा धाब्यावर बसवून थकबाकीबाबत महापालिकेने नोटीस न देता कारवाई केली, हे चुकीचे असल्याचे स्मिता माने यांनी सांगितले.मंगळवारी एकत्र बैठक घेणारहा सगळा प्रकार घडत असताना आयुक्त के. मंजुलक्ष्मी या रजेवर होत्या. त्यांच्याशी आदिल फरास यांनी संपर्क साधून यातून मार्ग काढावा लागेल असे सांगितले. तेव्हा आयुक्तांनी जलसंपदा विभागाने आकारलेली थकबाकी आपणाला मान्य नसल्याचे फरास म्हणाले. महापौर रुपाराणी निकम यांनी मंगळवारी आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेतले जातील, असे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Water Resources Dept Claims ₹165 Crore Dues; Corporation Disagrees.

Web Summary : Water Resources Department claims Kolhapur Municipal Corporation owes ₹165 crore in water dues. The Corporation disputes this, citing a prior agreement for ₹30 crore. Disagreement over water usage and tariff calculations led to the dispute, with a meeting scheduled to resolve the issue.