कोल्हापूर: मसाई पठारवरील मसाई देवीच्या मंदिरावर वीज कोसळून मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 11:34 IST2022-10-08T11:34:17+5:302022-10-08T11:34:47+5:30
मंदिरासमोर असणारी समाधी पुर्णपणे भग्न झाली आहे.

कोल्हापूर: मसाई पठारवरील मसाई देवीच्या मंदिरावर वीज कोसळून मोठं नुकसान
पन्हाळा : मसाई पठारवरील मसाई देवीच्या मंदिरावर वीज कोसळल्याची घटना घडली. वीज कोसळल्यामुळे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील छताला भेगा पडल्या असून मंदिराचे नुकसान झाले. तर मंदिरासमोर असणारी समाधी पुर्णपणे भग्न झाली आहे.
दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी जोरदार पाऊस व विजाचा कडकडात झाला. यात मंदिराच्या कळसावर वीज पडल्याची शक्यता आहे. मंदिराचे पुजारी अक्षय दळवी यांनी दुसऱ्या दिवशी येऊन बघितल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. दसऱ्याच्या दिवशी मसाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना वीज कोसळल्याचे दिसले. यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र, मंदिराचे नुकसान झाले आहे.
स्थानिक व भाविकांनी मंदिराची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली आहे. मानकातरेवाडी, दळवेवाडी या गावांमधील लोकांना विजेचा मोठा आवाज आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.