सर्वात उंच अश्वारूढ शिवपुतळा कोल्हापूर जिल्ह्यात 'या' गावात उभारण्यात येणार, लोकवर्गणीतून होणार प्रतिष्ठापना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 05:55 PM2022-07-21T17:55:54+5:302022-07-21T19:08:02+5:30

संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये सध्या २१ फुटी शिवपुतळा आहे. त्यापेक्षा या पुतळ्याची उंची जास्त

The tallest equestrian statue of Shiva in the country will be erected in Kolhapur district | सर्वात उंच अश्वारूढ शिवपुतळा कोल्हापूर जिल्ह्यात 'या' गावात उभारण्यात येणार, लोकवर्गणीतून होणार प्रतिष्ठापना

सर्वात उंच अश्वारूढ शिवपुतळा कोल्हापूर जिल्ह्यात 'या' गावात उभारण्यात येणार, लोकवर्गणीतून होणार प्रतिष्ठापना

googlenewsNext

निंगाप्पा बोकडे

चंदगड : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे प्रत्येक गावात आहेत अन् शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. बेळगावसह सीमाभागातही शिवजयंती उत्साहात साजरी होते. त्याचे अनुकरण आता चंदगड तालुक्यात जोरदार सुरू असून त्याचधर्तीवर तालुक्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा पुतळा देशातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. कुदनूर (ता. चंदगड) उभारण्यात येणाऱ्या महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याची उंची तब्बल २३ फूट आहे.

चंदगड तालुक्यात कोवाड, कालकुंद्री, धुमडेवाडी, मजरे कारवे, मुरकुटेवाडी या गावांमध्ये आकर्षक अश्वारूढ शिवपुतळे बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कुदनूर येथे पंचधातूचा तब्बल २३ फुटी देशातील सर्वात उंच शिवपुतळा उभारण्यात येणार आहे.  बेळगाव शहरात अनेक मूर्तिकार असून त्यांची किर्ती देशात सर्वदूर पोहचली आहे. त्यातीलच भांदूर गल्लीतील विनायक मनोहर पाटील हे गेल्या काही दिवसांपासून हा शिवपुतळा २३ फूट लांब व १० फूट रुंद फाऊंडेशनवर साकारत आहेत.

साडेचार टन वजनाचा पुतळा

बाँम्बे क्लेचा वापर करून मूर्ती तयार केली आहे. आता प्रत्येक भागाचा मोल्ड तयार करुन त्यात कास्टिंग ओतले जाणार आहे. पंचधातूचा हा पुतळा साधारणपणे साडेचार टन वजनाची राहणार आहे.

लोकवर्गणीतून शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना

तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे गाव म्हणून कुदनूर गावाकडे पाहिले जाते. अठरापगड जातीचे लोक गावात आहेत. पण येथील ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेला वाढता प्रतिसाद मिळत असून लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी या शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरविले आहे. त्या शिवमूर्ती मधून लोकांनी त्यांचे गुण घेऊन आत्मसात करावेत, यासाठी भव्यदिव मूर्ती करण्याचे ग्रामस्थांनी ठरविल्याचे पुतळा समिती अध्यक्ष डॉ. राहूल पवार यांनी सांगितले.

शिवअभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली शिवपुतळ्याचे काम

शिवपुतळ्यातील चुका टाळण्यासाठी आपले वडील जेष्ठ मूर्तिकार मनोहर पाटील, शिव अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. डिसेंबरमध्ये पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याचे मूर्तिकार विनायक पाटील यांनी सांगितले.

औरंगाबादमधील शिवपुतळ्याची उंची २१ फुट

संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये सध्या २१ फुटी शिवपुतळा व चौथरा ३१ फूट आहे. त्यानंतर आता चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे सर्वात उंच २३ फुट शिवपुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळा पाहण्यासाठी आतापासूनच बेळगावमधील भांदूर गल्लीत गर्दी होत आहे.

Web Title: The tallest equestrian statue of Shiva in the country will be erected in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.