शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

विद्यार्थीपूरक योजना, शाळांना माहितीच नाय; राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेतून मिळते अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 18:26 IST

२१ ऑगस्ट २०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार एखादा विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू पावला तरीही त्याला अनुदान मिळणार

समीर देशपांडेकोल्हापूर : पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याला अपघात झाला, शस्त्रक्रिया करावी लागली किंवा अपघाती, आजारपणाने मृत्यू झाला, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येते. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून पालकांना ही मदत मिळते याची माहितीच अनेक शाळांना नसल्याचे दिसून आले आहे.अशा पद्धतीने नुकसानभरपाई किंवा सुरक्षा कवच देण्यासाठी निधी देण्याची राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना विमा कंपन्यांमार्फत २० ऑगस्ट २००३ पासून राबवण्यात येत होती. या विम्याचे हप्ते शासन भरत होते; परंतु विमा कंपन्या अनेक कारणे सांगून पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होत्या. त्यामुळे ११ जुलै २०११ रोजी सानुग्रह अनुदान योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर २७ ऑगस्ट २०१२ पासून ती नियमितपणे राबवण्यात येऊ लागली.मात्र, या योजनेमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाला किंवा एखादा, दुसरा अवयव निकामी झाला तरच अनुदान मिळत होते. मात्र, २१ ऑगस्ट २०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार एखादा विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू पावला तरीही त्याला अनुदान मिळणार आहे. अपघातानंतर शस्त्रक्रिया करावी लागली तरीही अनुदान मिळणार आहे. मात्र, या नव्या योजनेची फारशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना नसल्याचे दिसून आले आहे.याबाबत माध्यमिक, प्राथमिक आणि महापालिकेचे शिक्षणाधिकारी आणि तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अधिकची माहिती मिळू शकते.

अशांना मिळते अनुदान

  • विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू १ लाख ५० हजार रुपये
  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास म्हणजे २ अववय, दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी झाल्यास १ लाख रुपये
  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व १ अवयव किंवा १ डोळा कायम निकामी झाल्यास ७५ हजार रुपये
  • अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा अधिकाधिक १ लाख रुपये
  • विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपये
  • विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास म्हणजे क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून अशांना प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा अधिकाधिक १ लाख रुपये या योजनेतून मिळू शकतात.

२१ जूननंतरच्या सर्वांना मिळू शकते अनुदान२१ जून २०२२ रोजी हा शासन आदेश काढण्यात आल्यामुळे त्यानंतर पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतीत असे प्रकार झाले असतील तर त्यांनी तातडीने याबाबत प्रस्ताव केल्यास त्यांनाही ही मदत मिळू शकते. पालक आणि शाळेने याबाबतचे प्रस्ताव तयार करावयाचे असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रस्तावांना अंतिम मान्यता देते. यावर जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरी आवश्यक असते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीAccidentअपघात