शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कारमधून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक; ८ लाखांच्या मद्यासह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:19 IST

कोल्हापूर : गोवा बनावटीची मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून गवसे (ता. आजरा) येथे ...

कोल्हापूर : गोवा बनावटीची मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून गवसे (ता. आजरा) येथे शुक्रवारी एकाला अटक केली. गणपत प्रभाकर माईनकर (वय २९, रा. कोलगाव, चाफेआळी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे त्याचे नाव आहे. वाहनांसह त्याच्याकडून २९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात ८ लाख ४० हजारांचे मद्य आहे.गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक गवसे मार्गावर होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या मार्गावर सापळा रचला. संशयित माईनकर याचे चारचाकी वाहन थांबविले असता कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये १ हजार ५६० सीलबंद बाटल्यांचे १३० बॉक्स सापडले. यामध्ये विदेशी मद्याची किंमत ८ लाख ४० हजार रुपये आहे. तर वाहनाची किंमत सुमारे २१ लाख असून २९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर विभागाचे उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी, मारुती पोवार, राहुल कुटे आदी सहभागी झाले. निरीक्षक के. एम. पवार पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग