Kolhapur: वर्दीतली माणुसकी!, अपघातातील गंभीर जखमीला पोलिस वाहनाने तातडीने उपचारासाठी नेले
By राजाराम लोंढे | Updated: September 16, 2024 19:06 IST2024-09-16T19:05:23+5:302024-09-16T19:06:03+5:30
कोल्हापूर : सकाळी पावणे अकराची वेळ. कागल- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत अज्ञात पादचारी ...

Kolhapur: वर्दीतली माणुसकी!, अपघातातील गंभीर जखमीला पोलिस वाहनाने तातडीने उपचारासाठी नेले
कोल्हापूर : सकाळी पावणे अकराची वेळ. कागल-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर एका पेट्रोल पंपाजवळ आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत अज्ञात पादचारी गंभीर जखमी झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला पोलिस वाहनाने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतूक होत आहे. दरम्यान, अपघातग्रस्त आयशर कंटेनर एका बाजूला घेत महामार्गाची वाहतूक सुरळीत केली.
अज्ञात पादचारी रस्ता ओलांडताना कागलकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या आयशर कंटेनर ट्रक (HR38 AF 9234) ने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाला व बेशुद्ध पडला. अपघाताची माहिती मिळतात उजळाईवाडी महामार्ग पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप जाधव, हेडकॉन्स्टेबल जावेद गडकरी, आकाश पाटील, ग्रेड पी.एस.आय. दीपक ठोंबरे आदी सहकाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ पोहोचले. जखमीला हायवे पेट्रोलिंगचे पोलिस वाहन क्र. (MH09 FQ 6308) मधून रुग्णालयात दाखल केले.