शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे जागा वाटप जाहीर; भाजप ३६, शिंदेसेना ३०, राष्ट्रवादीला १५ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:03 IST

मात्र, उमेदवारांची घोषणा नाहीच

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी भाजप ३६, शिंदेसेना ३० आणि राष्ट्रवादी अजित पवार १५ जागा लढवणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत केली. जागा वाटपाचे आकडे जरी जाहीर केले असले तरी उमेदवारांची घोषणा करणे महायुतीने टाळले असून, ही यादी आज, मंगळवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी जाहीर होणार आहे.पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद झाली.रविवारी दिवसभर पुलाची शिरोली येथील महादेवराव महाडिक यांच्या पंपावरील बैठकीनंतर जिल्हा बॅंकेतही रात्री बैठक झाली होती. तरीही महायुतीमधील जागांचा तिढा काही सुटला नव्हता. म्हणून पुन्हा महायुतीचे नेते सकाळपासून तीन वेगवेगळ्या ठिकाणी बसून चर्चा करत होते. अखेर जिल्हा बॅंकेत पाचच्या सुमारास महायुतीचे नेते जमले आणि तेथेच जागांवर एकमत झाले. तेथूनच पत्रकार परिषदेचे निरोप देण्यात आले.

वाचा : हलगीचा कडकडाट, शक्तिप्रदर्शनाने जत्रेचे स्वरुप; १७० अर्ज दाखल, आज शेवटचा दिवसमहापालिकेच्या गेल्या सभागृहात भाजप आणि महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडीचे ३३ नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे १५, तर शिवसेनेचे केवळ चार नगरसेवक होते. त्यामुळे भाजपने सुरुवातीपासून ३३ जागांपेक्षा एकही जागा कमी घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती. हे ओळखलेल्या आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या विधानसभेपासून जो ‘इनकमिंग’चा धडाका लावला होता तो अगदी सोमवारी संध्याकाळपर्यंत सुरू होता. त्यामुळे त्यांनी भाजपच्या बरोबरीने जागा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

वाचा : काँग्रेससह शिंदेसेना, भाजपमध्येही बंडाळी सुरु; अक्षय जरग, राहुल चव्हाण, रामुगडे अपक्ष; संदीप नेजदार नॉटरिचेबल

परंतु, तरीही भाजपने त्यांना ३० जागांवरच रोखले. त्यांनीही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यात यश मिळवले. मंत्री मुश्रीफ यांनी २० जागांची मागणी केली होती. परंतु, त्यांना गेल्यावेळच्या नगरसेवकांएवढ्या म्हणजे १५ जागांवरच समाधान मानावे लागले.

एबी फॉर्मचे वाटप सुरूजरी महायुतीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नसली तरी तीनही पक्षांनी एबी फार्म देण्यास सुरुवात केली आहे. आज, मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने साहजिकच निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तबमहायुतीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेला समसमान जागा असाव्यात यासाठी शेवटपर्यंत शिंदेसेनेच्या मंत्री, खासदार, आमदारांनी प्रयत्न केले. त्यामुळे तसा फॅार्म्युलाही चर्चेत आला होता. परंतु, २७ डिसेंबरलाच ‘लोकमत’ने भाजपच जागा वाटपात मोठा भाऊ ठरणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर शिक्कामोर्तब झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Election 2026: Mahayuti Seat Allocation Announced

Web Summary : Mahayuti announced seat allocation for Kolhapur Municipal Election: BJP 36, Shinde Sena 30, NCP 15. Candidate list to be released soon. AB forms distribution started.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार