शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पाऊस काही थांबेना.. शेतीचे पंचनामे होईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 17:00 IST

पाणी वाढले फुटांनी.. कमी होतेय इंचाने 

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेले महापुराचे पाणी चार दिवसात फुटा फुटांनी वाढले पण ते कमी होत आहे इंचा इंचाने, त्या गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा धोधो कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा धडकी भरली आहे. या पूर, पावसाच्या खेळात पंचनाम्यांचा मात्र खेळखंडोबा होत आहे.आठवड्यापूर्वी पर्यंत म्हणजे शनिवारपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट होता. त्यानंतर गेल्या आठ दिवसात पुराचे पाणी फक्त ५ फुटांनी कमी झाले आहे. कोल्हापूर शहरातील व्हिनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, कुंभार गल्ली, नागाळा पार्क सारख्या भागांतून पुराचे पाणी ओसरले आहे पण, अजूनही पंचगंगा हॉस्पिटल, शिवाजी पूल, त्यापुढे चिखली, आंबेवाडी सारख्या गावांतील पाणी पूर्णत : ओसरलेले नाही. काही घरांमध्येही अजून पाणी आहे. त्यामुळे या मिळकतींचे पंचनामे करता येईनात.

या आहेत अडचणी

  • काही घरांमध्ये अजून पाणी आहे, शेतीतील पाणी तर ओसरायचे नावच घेत नाही त्यामुळे पंचनामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांना जाता येईना.
  • घरमालक आणि भाडेकरूंचा वाद. भाडेकरूंनी घरमालकासोबत करारनामा केला असेल तर नुकसानीची रक्कम भाडेकरूला देता येते. पण तसे नसेल, तर घरमालकाला रक्कम दिली जाते.
  • एकाच कुटुंबात पण चारही भाऊ वेगवेगळे राहत आहेत. ते एकाच मिळकतीचा घरफाळा भरत असतील, घर एकाच्याच नावे असेल तर रक्कम नेमकी कुणाच्या खात्यावर पाठवायची.

धोरणाची प्रतीक्षानुकसान भरपाईच्या रकमेबाबत शासनाकडून अधिसूचना काढली जाते. २०२३ मध्ये काढलेल्या अधिसूचनेत घरात २ दिवसांहून अधिक काळ पुराचे पाणी राहिले तर १० हजार रुपये देण्याची तरतूद होती. शिवाय दुकाने व टपरी मालकांनाही यात धरले होते पण यावर्षी नेमके काय करायचे आहे याची अधिसूचना शासनाने काढलेली नाही. सध्या तरी प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या मिळकतींचे पंचनामे केले जात आहेत.

काही घरे व शेतीतील पाणी ओसरलेले नसल्याने पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. पण जिथे पंचनामे सुरू आहेत. तिथे नागरिकांकडून खूप चांगले सहकार्य मिळत आहे. कुठेही तक्रारी झालेल्या नाहीत. - हरिश धार्मिक, प्रांताधिकारी, करवीर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरAgriculture Sectorशेती क्षेत्र