शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पिलरच्या उड्डाणपुलास ९८० कोटी रुपये लागणार, महापुरातही महामार्ग सुरु राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:39 IST

सन २०१९ आणि २०२१ साली दोनदा महामार्गावर पाणी येऊन महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता.

सतीश पाटीलकोल्हापूर : शिरोली सांगली फाटा ते  उचगाव दरम्यान सुमारे साडे तीन किलोमीटर पर्यंतच्या पिलरचा उड्डाणपूल आणि बास्केट ब्रिज करण्याचा (DPR) प्रोजेक्ट रिपोर्ट अहवाल पूर्णत्वास आला असून या उड्डाणपूलासाठी अंदाजे सुमारे ९८० कोटी रुपये निधी लागणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भोपाळ येथील एल एन मलविया कंपनीने तयार केलेला प्रकल्प अहवाल १० जूनपर्यंत केंद्र शासनाला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सादर केला जाणार आहे. मुदतीत निधी मंजूर झाला आणि हे काम झाल्यास महापुरातही हा महामार्ग कायमस्वरुपी सुरु राहू शकतो.शिरोली सांगली फाटा पासून पंचगंगा नदी आणि तावडे हॉटेल पासून उचगाव रेल्वे पूल दरम्यान सन २०१९ आणि २०२१ साली दोनदा महामार्गावर पाणी येऊन महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. कागल सातारा सहापदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. हे काम सुरू असताना सुरुवातीला शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे पूल दरम्यान महामार्गावर १० फूटांचा भराव टाकून रस्त्याची उंची वाढवली जाणार होती. आणि पंचगंगा नदीचे व महापुराचे पाणी जाण्यासाठी छोटे गाळे तयार केले जाणार होते. पंचगंगा नदीवर बंधारा तयार होऊन पाण्याची फुगी वाढून नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा धोका निर्माण होणार होता.  तसेच शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार होते. म्हणून शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे पूल दरम्यान महामार्गावर पिलरचा उड्डाणपूल उभा करावा अन्यथा काम बंद पाडू  असा इशारा देत पूरग्रस्त समितीने पंचगंगा नदी पुलाजवळ एकदिवसीय ठिय्या आंदोलन केले होते.‌ यानंतर जिल्ह्यातील मंत्री आणि आमदार, खासदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन, भेट घेऊन याठिकाणी पिलरवरचा उड्डाणपूल करावा अशी मागणी उचलून धरली. यावर गडकरी यांनी कोल्हापूरच्या जनतेची मागणी असेल तर याठिकाणी पिलरवरचा उड्डाणपूल करु यासाठी नवीन प्रस्ताव द्या असे सांगितले होते.

असा असेल पिलरचा उड्डाणपूल 

  • उड्डाणपूलाची लांबी ३५५० मिटर..
  • प्रत्यक्षात पिलरचा उड्डाणपूल २४७५ मिटर 
  • उचगाव रेल्वे पूलानंतर रस्ता १०४५ मिटर 
  • शिरोली सांगली फाटा नंतर ३० मिटर 
  • रस्त्याची रुंदी ३० मिटर 
  • सेवामार्ग लांबी ५८२६ मीटर 

सांगलीहून शिरोली सांगली फाटा येथून महामार्गावर जाण्यासाठी २७० मिटरचा रॅम्प रस्ता १२० मिटरचा मर्जिंग रस्ता, ८.५ मिटर रस्त्याची रुंदी.गांधीनगरहून महामार्गावर जाण्यासाठी १७१ मिटरचा रॅम्प रस्ता, ८.५ मिटर रस्त्याची रुंदी.कोल्हापूरला जाण्यासाठी १३४५ मिटर चा रस्ता८.५ मिटर रस्त्याची रुंदी.कोल्हापूरहून महामार्गावर येण्यासाठी ५९० मिटर चा रस्ता, ८.५ मिटर रस्त्याची रुंदी.

२०२३ सालीच ग्रीन सिग्नलकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अधिकारी, ठेकेदार यांची २३ डिसेंबर २०२३ रोजी गोवा येथील ताज हॉटेलमध्ये बैठक घेऊन लोकांना त्रास होऊ नये आणि मागणी असेल तर शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे पुलापर्यंत पिलरचा उड्डाणपूल करा. याबाबत अभ्यास करून वाढीव प्रस्ताव सादर करा, असे सांगून पिलरच्या उड्डाणपुलाला ग्रीन सिग्नल दिला होता.

डीपीआर तयार, मंजुरीनंतर काम हाेणार सुरूपुणे-बंगळुरू महामार्गावरील सांगली फाटा ते उचगाव आणि कागल शहरातील उड्डाणपूल, पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रिज यांचे ‘डीपीआर’ तयार केले आहेत. येत्या आठवड्यात हे ‘डीपीआर’ केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव मंजूर करून त्याची निविदा आणि टेंडर काढून या कामाचा नवीन ठेकेदार नेमण्यात येणार असून, त्यानंतर हे काम सुरू होणार आहे.

शिरोली-सांगली फाटा ते उचगाव रेल्वे उड्डाणपुलापर्यंत पिलरचा उड्डाणपूल लवकर होणे आवश्यक आहे. यामुळे महापुराचा धोका टळणार आहे तसेच वाहतुकीची कोंडी आणि अपघात होणार नाहीत. या उड्डाणपुलास मंजुरी देऊन लवकरात लवकर काम सुरू करावे. - शशिकांत खवरे, माजी सरपंच 

महापुरामुळे महामार्गावर बंधारा तयार होऊन शिरोली गावासह इतर गावांना तसेच कोल्हापूर शहराला महापुराचा विळखा पडत होता. पिलरचा उड्डाणपूल झाल्यावर शिरोलीसह पंचगंगा नदीकिनाऱ्यावर असणाऱ्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. -पद्मजा करपे, सरपंच, शिरोली

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरhighwayमहामार्ग