कोल्हापुरात होणार पी ढबाकचा गजर, उद्यापासून त्र्यंबोली देवीच्या यात्रेला प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:58 IST2025-06-26T16:58:43+5:302025-06-26T16:58:58+5:30

यात्रेसाठी मिळणार चार मंगळवार, चार शुक्रवार

The pilgrimage to Trimboli Devi in ​​Kolhapur begins tomorrow | कोल्हापुरात होणार पी ढबाकचा गजर, उद्यापासून त्र्यंबोली देवीच्या यात्रेला प्रारंभ 

कोल्हापुरात होणार पी ढबाकचा गजर, उद्यापासून त्र्यंबोली देवीच्या यात्रेला प्रारंभ 

कोल्हापूर : पंचगंगा नदीला आलेले नवे पाणी आषाढात कोल्हापूरची रक्षकदेवता असलेल्या त्र्यंबोली देवीला वाहण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार शुक्रवारपासून त्र्यंबोली देवीच्या यात्रेला प्रारंभ हाेत आहे. यंदा आषाढातील चार शुक्रवार आणि चार मंगळवार यात्रेसाठी मिळणार आहे. मात्र आषाढी एकादशीनंतरच यात्रेचा खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.

रणरणत्या उन्हाळ्यानंतर पावसाची सुरुवात होते. पंचगंगा नदीला नवे पाणी येते हे पाणी वाजतगाजत त्र्यंबोली देवीच्या चरणावर वाहिले जाते. कुमारिका, सुवासिनी महिला हे पाणी सजवलेल्या कळशीतून डोक्यावरून घेऊन जातात. मिरवणुकीत पारंपरिक वाद्य असलेला पी ढबाकचा गजर होतो. बुधवारी अमावस्या झाल्याने कोल्हापुरकरांना आता त्र्यंबोली यात्रेचे वेध लागले आहेत.

यंदा यात्रेसाठी चार मंगळवार आणि चार शुक्रवार मिळत आहेत. मात्र आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा होईपर्यंत यात्रांचे प्रमाण कमी असते. यंदा ६ ऑगस्टला आषाढी एकादशी आहे. त्यानंतर येणाऱ्या मंगळवारी भौम प्रदोष आहे. त्यामुळे या दिवशी यात्रेची शक्यता कमी आहे. गुरुवारी (दि. १०) गुरुपौर्णिमा आहे. त्यानंतर ११, १५ १८ व २२ जुलै या चार दिवसांतच मोठ्या प्रमाणात त्र्यंबोली यात्रा होतील.

  • शुक्रवार : २७ जून, ४, ११, १८ जुलै
  • मंगळवार : १, ८, १५, २२ जुलै.
  • आषाढी एकादशी : ६ ऑगस्ट
  • गुरुपौर्णिमा : १० ऑगस्ट

Web Title: The pilgrimage to Trimboli Devi in ​​Kolhapur begins tomorrow