शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनाचा मार्ग प्रशस्त होणार; सुधारित ५९५ कोटींच्या आराखड्यात प्रस्तावित 

By भीमगोंड देसाई | Updated: March 16, 2026 12:39 IST

महाद्वारचे १९ मीटर, जोतिबा रोडचे ९ मीटर रुंदीकरण; एक हजारपेक्षा अधिक चारचाकीचे वाहनतळ

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराच्या सुधारित ५९५ कोटी १५ लाख २३ हजार रुपयांच्या आराखड्यात राजाराम, जोतिबा रोडचे नऊ मीटर आणि महाद्वार रोडचे १९ मीटर रुंदीकरणासह चौफेर विकास करण्यात येणार आहे. परिसरातील रस्ते, दर्शन मंडप, सुसज्ज पार्किंग तळ, दर्जेदार मूलभूत सुविधा, दुकाने, पोलिस स्टेशन इमारत यासाठी एकूण १० लाख ९५ हजार ६४ स्क्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहे.पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच सुधारित मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मंदिराच्या संरक्षक भिंतीपासून १० मीटर परिघाचे भूसंपादन होणार आहे. दरम्यान, आराखड्यात भाविक, पर्यटकांना अधिकाधिक सेवा, सुविधा देणे, वाहनतळ निर्माण करणे, स्थानिकांना त्याच परिसरात व्यवसायासाठी जागा देण्याचे नियोजन केले आहे.

वाचा: गुढीपाडव्याला ३५१ भरा, अंबाबाईला साडी अर्पण करा; भाविकांना फसवण्याचा ऑनलाईन फंडाया आराखड्यावर आणखी खुलेपणाने सविस्तर चर्चा होणार आहे. चर्चेेत स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सामावून घेण्यात येणार आहे. संबंधित सर्व घटकांना विश्वासात घेऊन विकासकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाचे आहे.

प्रस्तावित मंदिर परिसरात सेवा

  • सुविधांचे प्रस्तावित बांधकाम क्षेत्र स्क्वेअर फुटात असे..
  • राजाराम रोडकडील विभाग : ८ लाख ९६ हजार ४३२
  • लँडस्केप प्लाझा : २ लाख ६७ हजार २७१
  • महाद्वार रोडकडील विभाग : १ लाख २६ हजार ३६८
  • दर्शन मंडप : ५८ हजार ९८३
  • स्वच्छतागृह : ९८२
  • पोलिस स्टेशन : ३२२
  • जुनी मंदिरे : ११८४
  • बैठक व्यवस्था : १० हजार ७८९
  • रस्ते रुंदीकरण : ८१ हजार ४४७
  • नव्याने रस्ते : १४ हजार ७७०

कोणत्या कामावर किती तरतूद ?

  • नव्याने बांधकाम, फर्निचर : ४५३ कोटी ६६ लाख
  • संवर्धन : ९ कोटी ४३ लाख
  • पाणीपुरवठा, सांडपाणी निर्गत : ४१ कोटी ८० लाख
  • इलेक्ट्रीफिकेशन, फायर फिटींग : ९० कोटी २४ लाख

एक हजारपेक्षा अधिक चारचाकीचे वाहनतळराजाराम रोडकडील वाहनतळ तळमजल्यावर तीन टप्पे, तळमजला, पहिला मजला असे होणार आहे. येथे १०१८ चारचाकी आणि ९७६ दुचाकीच्या पार्किंगची सुविधा होणार आहे. महाद्वार रोडकडे दोन मोठे शॉपिंग प्लाझा होणार आहेत. यामध्येही दुचाकी पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे. मंदिर परिसरातील महादेव मंदिराजवळ व्हीआयपी वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. बिंदू चौकातील आताच्या वाहनतळाजवळ सबजेल आहे. त्याचे स्थलांतर झाल्यानंतर तेथील हेरिटेल इमारती कायम राखून भव्य असे वाहनतळ उभारण्यात येणार आहे.

बिंदू चौकाजवळ व्यवसायासाठीच्या सेवा, सुविधा...बिंदू चौकाजवळ ४४ हजार ३७५ स्क्वेअर मीटरचे क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. यातील २४ हजार ६५२ स्क्वेअर मीटरचे बांधकाम करण्यात येणार आहे.

परिसर विकसित झाल्यानंतर रहिवासी, व्यावसायिक क्षेत्र वाढणार..महाद्वार रोड, सरलष्कर भवन, राजाराम रोडवर सध्या १ लाख ९५ हजार २१७ स्क्वेअर फूट इतके रहिवास क्षेत्र आहे. विकसित केल्यानंतर यामध्ये ४८ हजार ८०४ चौरस फुटाचे क्षेत्र वाढणार आहे. याच परिसरात आता व्यावसायिक क्षेत्र १ लाख २७ हजार चौरस फूट आहे. विकसित केल्यानंतर यामध्ये ३१ हजार ७५१ चौरस फुटांनी वाढणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ambabai Temple, Kolhapur, to get Facelift with ₹595 Crore Plan

Web Summary : Kolhapur's Ambabai temple area will be redeveloped with a ₹595 crore plan. This includes road widening, parking, shops, and improved facilities for devotees and tourists, enhancing the overall experience and local business opportunities.