शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे कोल्हापूरकरांना आज ‘उत्तर’ मिळणार, उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 12:45 IST

इच्छुकांची आज काँग्रेस कमिटीत बैठक 

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे बहुतांश मतदारसंघांतील उमेदवार निश्चित झाले असले, तरी ‘कोल्हापूर उत्तर’चा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. यासाठी आज सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी इच्छुकांची बैठक बोलावली आहे. आजच्या बैठकीनंतर कोल्हापूरकरांना उमेदवारीचे ‘उत्तर’ मिळणार का, याकडे उत्सुकता लागली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तरीही महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित होत नाहीत. काँग्रेसकडेकोल्हापूर उत्तर’मध्ये सर्वाधिक इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार, याविषयी कमालीची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ आपणाला मिळावा, यासाठी उद्धवसेनेने दावा केला आहे. त्यांच्याकडून पक्षाचे उपनेते संजय पवार, शहरप्रमुख रविकिरण इंगवले इच्छुक आहेत.काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून विद्यमान आमदार जयश्री जाधव, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह डझनभर इच्छुक आहेत. यापैकी कोणाला संधी मिळते की सतेज पाटील नवीन चेहरा समोर आणतात, हे पाहावे लागणार आहे.याबाबत, आज काँग्रेस कमिटीत इच्छुकांची बैठक बोलावली आहे. यामध्ये इच्छुकांची मते अजमावून घेतली जाणार आहेत. काँग्रेसचे सर्वच उमेदवार उद्या, गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आज, ‘कोल्हापूर उत्तर’च्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.

‘ते’ उद्योगपती कोण?आमदार सतेज पाटील यांनी ‘कोल्हापूर उत्तर’च्या उमेदवारीबाबत कमालीचा सस्पेन्स ठेवला आहे. मराठा उद्योजक रिंगणात उतरणार असल्याची काँग्रेस अंतर्गत चर्चा सुरू असली, तरी ‘ते’ उद्योगपती कोण, याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस