दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात नवीन अश्वाचे वाजत गाजत आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 21:16 IST2022-04-11T21:15:32+5:302022-04-11T21:16:13+5:30
मंदिरात अश्वाची प्रदक्षिणा करून देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्याकडे हा अश्व सुपूर्द करण्यात आला.

दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात नवीन अश्वाचे वाजत गाजत आगमन
कोल्हापूर: दोन महिन्यांपूर्वी जोतिबा मंदिरात सेवेसाठी असणाऱ्या अश्वाचे निधन झाले होते. त्यानंतर नवीन अश्वाची शोध मोहीम सुरू होती. नवीन अश्व मिळाल्याने ही शोध मोहीम थांबली. हिम्मत बहाद्दर चव्हाण सरकार, निगवे दुमाला, करवीर यांच्यामार्फत दख्खनचा राजा जोतिबा यांच्या चरणी हा नवीन अश्व सोपविण्यात आला. रणजितसिह दिलीपसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण, आर्यवीर चव्हाण हर्षदा चव्हाण, रविराज निंबाळकर उपस्थित होते.
अश्वाचे स्वागत संपूर्ण ग्रामस्थ, पुजारी आणि देवस्थान यांच्या मार्फत करण्यात आले. यावेळी महिलांनी औक्षण करून नवीन अश्वाची पूजा केली. मंदिरात घंटानाद करण्यात आला. मंदिरात अश्वाची प्रदक्षिणा करून देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्याकडे हा अश्व सुपूर्द करण्यात आला.