शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे दक्षिणेत मिटलंय, उत्तरेत पेटलंय; नेत्यांची आज पुन्हा बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:57 IST

मुश्रीफ यांचाही कमी जागा घेण्यास नकार, क्षीरसागर यांच्या ‘इनकमिंग’ मोहिमेमुळे अडचणी

कोल्हापूर : महायुतीच्या जागा वाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरू असून, त्यातही ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा विषय संपत आला असून, ‘उत्तर’मध्ये मात्र विषय अजूनही धगधगताच आहे. अशातच हसन मुश्रीफ यांनीही १५ पेक्षा कमी जागा घेण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, भाजपची मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जागा वाटपाबाबत चर्चा झाली.भाजपची पुण्यातील शुक्रवारची बैठक आटोपून मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक हे मुंबईला रवाना झाले होते. मुंबईतील चव्हाण यांच्या बैठकीला या तिघांसह संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश सचिव महेश जाधव आणि महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची उपस्थिती होती. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत झालेल्या या बैठकीत भाजपने त्यांच्यापुरता विषय अंतिम करून घेतला आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी पुन्हा कोल्हापूरला परत आली आहेत. अमल महाडिक यांच्या दक्षिण मतदारसंघातील बऱ्यापैकी विषय संपला असला तरी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उत्तर मतदारसंघामध्ये मात्र सहा, सात ठिकाणी पेच निर्माण झाल्याचे समजते.दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, रत्नेश शिरोळकर यांची एक बैठक येथील एका हॉटेलवर गुरुवारी सकाळी घेण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित हुक्केरीकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी भाजपकडून आणखी चार, पाच जागा कशा पदरात पाडून घेता येतील यासाठी शिंदेसेना आग्रही असल्याचे पाहावयास मिळाले.

क्षीरसागर यांच्या ‘इनकमिंग’ मोहिमेमुळे अडचणीआमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या विधानसभेपासून शहरभरातील अनेक प्रमुख आणि ताकदवान नेते, कार्यकर्त्यांचे जोरदार इनकमिंग करून घेतले. अगदी कालपर्यंत हे इनकमिंग सुरू होते. त्यामुळे आता या सर्वांना उमेदवार निवडीत स्थान देताना अडचणी येत आहेत. दुसरीकडे शिंदेसेनेत घेतलेले सत्यजित कदम आणि शारंगधर देशमुख हे देखील आपल्या काही कार्यकर्त्यांसाठी आग्रही आहेत. त्यामुळेच भाजपच्या कोट्यातून जागा काढून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

पुण्यातील बैठकीला न बोलावल्याने मुश्रीफ यांची नाराजीपुण्यात बुधवारी झालेल्या बैठकीला भाजप आणि शिंदेसेनेचे प्रमुख नेते हजर होते; परंतु या बैठकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार)चे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. कोल्हापूर महापालिकेला राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक होते. त्यामुळे त्यापेक्षा कमी जागा आम्ही घेऊ, अशी अपेक्षा कोणी ठेवू नये अशीही भूमिका मुश्रीफ यांनी घेतली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Alliance Talks Stall; Factions Clash Over Seats Before Election

Web Summary : Kolhapur's ruling alliance faces seat-sharing hurdles before the 2026 election. Disagreements persist, especially in the northern constituency, while Hasan Mushrif demands a significant seat share. Internal competition complicates negotiations.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीBJPभाजपाHasan Mushrifहसन मुश्रीफRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर