ललित महोत्सवाने जोतिबा नवरात्रोत्सवाची सांगता, गरूडारूढ विष्णूच्या रूपात बांधली पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 13:55 IST2022-10-08T13:42:54+5:302022-10-08T13:55:30+5:30

रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. आज, सकाळी सहा वाजता धुपारती सोहळ्याने ललित महोत्सवाची सांगता झाली.

The Lalit Mahotsav concludes the Jotiba Navratri festival, with a pooja built in the form of Garudaharudh Vishnu | ललित महोत्सवाने जोतिबा नवरात्रोत्सवाची सांगता, गरूडारूढ विष्णूच्या रूपात बांधली पूजा

ललित महोत्सवाने जोतिबा नवरात्रोत्सवाची सांगता, गरूडारूढ विष्णूच्या रूपात बांधली पूजा

जोतिबा: जोतिबा नवरात्रोत्सवाची आज शनिवारी सकाळी ललित महोत्सवाने सांगता  झाली. आजच्या दिवशी जोतिबाची गरूडारूढ विष्णूच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती.

जोतिबा मंदिरात लळित महोत्सव साजरा झाला. जोतिबा नवरात्रोत्सवाची सांगता ही खऱ्या अर्थाने ललित महोत्सवाला होते. कमळ भैरवाने नवरात्रोत्सवात जोतिबाची सुवर्ण कमळ पुष्पामध्ये पूजा बांधली. म्हणून जोतिबा देवाने विष्णू रूपातील अवतारामध्ये कमळ भैरवाला दर्शन दिले अशी आख्यायिका सांगितली जाते. मंदिरात शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले. आज, सकाळी सहा वाजता धुपारती सोहळ्याने ललित महोत्सवाची सांगता झाली.

Web Title: The Lalit Mahotsav concludes the Jotiba Navratri festival, with a pooja built in the form of Garudaharudh Vishnu