धबधब्याखाली भिजताना आनंदाचे डोही, जिवावर बेतेल निष्काळजी अन् घाई

By संदीप आडनाईक | Updated: June 28, 2025 15:59 IST2025-06-28T15:59:10+5:302025-06-28T15:59:50+5:30

संदीप आडनाईक कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत. पावसाळ्यात असंख्य धबधबे ठाई ठाई पाहायला ...

The joy of soaking under a waterfall, carelessness and haste will take their toll on your life. | धबधब्याखाली भिजताना आनंदाचे डोही, जिवावर बेतेल निष्काळजी अन् घाई

धबधब्याखाली भिजताना आनंदाचे डोही, जिवावर बेतेल निष्काळजी अन् घाई

संदीप आडनाईक

कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत. पावसाळ्यात असंख्य धबधबे ठाई ठाई पाहायला मिळतात. या धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. उंच पाषाणावरून खाली कोसळणारा प्रपात आणि त्यातून तयार होणारा पांढरा फेस आणि या सर्वांमधून निर्माण होणारा आवाज हा सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकत आहे.

यामुळे आता पर्यटकांची पावले आता अनेक धबधब्यांकडे वळत आहेत. पावसाळ्यातील हे उंच डोंगरमाथ्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पाहणे हे पर्यटकांसाठी नेहमीच एक अविस्मरणीय अनुभव असतो. मात्र धबधब्याखाली आनंद लुटताना अतिघाई जिवावर बेतेल याचीही काळजी घेतली पाहिजे.

जिल्ह्यातील आंबोली, रामतीर्थ, बर्की, राऊतवाडी, हसणे, माऊली कुंड, रामणवाडी, तोरस्करवाडी, कासारवाडी, कावळटेक, चंदगड येथील धबधब्यांच्या ठिकाणांना आता जत्रेचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यात या कोसळणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेताना थोडी काळजी घेणेही आवश्यक आहे. शाहुवाडी तालुक्यातील कडवी धरण परिसरातही एकाहून एक सुंदर धबधबे, कोसळणारा पाऊस, दाट जंगल पाहण्याची संधी आहे.

काय काळजी घ्यावी?

  • निसरडे दगड, सस्त्यावर चालताना काळजी घ्या
  • धबधब्याच्या प्रवाहात जाणे टाळा
  • पायार रबर सोल असलेले बूट, हातात छोटी काठी ठेवा
  • प्रथमोपचार किट ठेवा
  • लहानांसह जेष्ठांना एकटे सोडू नका
  • खोल पाण्यात जाऊ नका
  • काठांवर रील्स बनवू नका


जिल्ह्यातील धबधबे

 

  • चांदोली धरणाच्या थारोळ्याच्या धबधबा
  • कानधार डोह
  • मनोळी धबधबा,
  • पालेश्वर धबधबा
  • शिराळे तर्फ मलकापूर जवळ रिंगेवाडी धबधबा,
  • सोनुर्लेचा रंजन धबधबा
  • तापेरा-बर्की धबधबा
  • पडसाळी धबधबा
  • वाशीचा कापूरकडा धबधबा
  • गाधाडी धबधबा
  • पळसंबेचा रामलिंग धबधबा
  • तिसंगीचा तांदुळवाडी धबधबा
  • मौली कुंड धबधबा
  • राऊतवाडी धबधबा, राधानगरी
  • कासारवाडी धबधबा
  • रामनवाडी धबधबा, राधानगरी
  • तोरस्करवाडी धबधबा, दुबलेवाडी
  • तमाशाचा खडक धबधबा, फये,
  • रामतिर्थ धबधबा, आजरा
  • बाबा धबधबा, कुंभवडे
  • केगडवाडी धबधबा
  • नांगरतास धबधबा, आंबोली
  • धनगरमोला धबधबा, धनगरवाडी धरण
  • व्ह्यू पाॅईंट धबधबा, इसापूर रस्ता
  • पाॅप्युलर धबधबा, तिलारीनगर
  • ग्रीन व्हॅली धबधबा,तिलारीनगर
  • असला धबधबा, तिलारीनगर
  • तिलारी धबधबा,
  • तिलारीचा इरू क्लिक धबधबा
  • स्वप्नवेल रिसॉर्ट धबधबा
  • केर्ले धबधबा, आंबा
  • उजळाईवाडी धबधबा
  • गोकुळ शिरगाव नाला धबधबा
  • किटवाडचा धबधबा

Web Title: The joy of soaking under a waterfall, carelessness and haste will take their toll on your life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.