शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वैद्यकीय बिलांच्या मंजुरीत पैशांची देव-घेव; डॉ. देशमुख, वाडीकर यांच्यावर ठपका, मंत्री आबिटकरांच्या भूमिकेकडे लक्ष

By समीर देशपांडे | Updated: February 20, 2026 13:07 IST

तब्बल ५८१ पानांचा अहवाल सादर

समीर देशपांडेकोल्हापूर : वैद्यकीय बिलांच्या फाइल्सच्या मंजुरीसाठी कोणाला किती पैसे दिले, याचा हिशेब असलेल्या नोंदवहीप्रकरणी आधीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख आणि सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक वाडीकर यांच्यावर चौकशी समितीने ठपका ठेवला आहे. या सर्व प्रकरणामध्ये हे दोन्ही जिल्हा शल्यचिकित्सक ५०:५० टक्के दोषी असल्याचेही या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!दहा दिवसांपूर्वी चौकशी समितीने या प्रकरणाचा अहवाल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना सादर केला असून, आता सार्वजनिक आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर हे या प्रकरणी नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी कार्यकर्त्यांसह ‘सीपीआर’मध्ये ८ डिसेंबर २०२५ रोजी स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी वैद्यकीय बिलांच्या फाइल्स मंजूर करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पैशाच्या देवाण-घेवाणीची तारीखवार नोंद असलेली लाल वहीच सापडली होती.याचदरम्यान नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्यामध्ये दुसऱ्या दिवशी हा विषय निघाल्यानंतर सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी संबंधितांची चांगलीच कानउघाडणी केली आणि आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. संजय रणवीर, सांगलीच्या सीएस कार्यालयातील दीपक वरक यांची चौकशी समिती नेमली. दुसऱ्याच दिवशी कक्षसेवक शशिकांत कारंडे याची खुपिरे ग्रामीण रुग्णालयाकडे तडकाफडकी बदली करण्यात होती.या तिघांनीही चार दिवसांनी चौकशीला सुरुवात केली खरी; परंतु तेथील कामकाज पाहिल्यानंतर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ या चौकशी अधिकाऱ्यांवर आली. कारण या ठिकाणी वैद्यकीय बिलांच्या फाइल्सबाबत कुठेही आवक, जावक नोंद नियमितपणे केलेली नव्हती. ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये प्रशासकीय कार्यपद्धती अवलंबायला हवी ती तशी न अवलंबता गैरकारभाराला सोयीची अशी कामाची पद्धत राबविल्याचे स्पष्ट झाले होते.

कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नसल्याने या चौकशी पथकाला तेथील कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने पहिले १५ दिवस तेथील रेकार्ड लावून घेण्याचेच पहिल्यांदा काम करावे लागले. या सर्व बाबींचा या चौकशी अहवालामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

आधीपासून गैरकारभार, पुढेही तसाच चालूआधीच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ज्या पद्धतीने वैद्यकीय बिलाच्या फाइल्स मंजुरीसाठीचे वैयक्तिक धोरण राबविले होते. त्यामध्ये कोणताही बदल न करता विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्याच पद्धतीने धोरण सुरू ठेवले.

तातडीने कारवाई आवश्यकआधीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाला चुकीचे प्रमाणपत्र दिल्याचे पुराव्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाने उघडकीस आणून तसा अहवाल सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवला; परंतु त्यांच्यावर कोणती झाली, हे या विभागाने कधी स्पष्ट केलेले नाही.

अधिवेशनात आमदार भास्कर जाधव यांनी लाल नोंदवहीबाबत विचारणा केली. तेव्हा दोषींवर कडक कारवाई करून वैद्यकीय बिलांच्या फाइल्सबाबत राज्यात ऑनलाइन धोरण राबविणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी जाहीर केले होते. आता हा अहवाल गेल्यानंतर संबंधितावर काय कारवाई होणार आणि हे नवे धोरण कधी येणार, याची राज्यभरात प्रतीक्षा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Bribery in Medical Bill Approvals; Officials Implicated, Minister's Action Awaited

Web Summary : An inquiry implicated two Kolhapur civil surgeons in a bribery scheme involving medical bill approvals. A ledger detailing illicit payments was discovered. The public health minister is now expected to take action following the report's submission, with statewide anticipation for new online policies.