मध्यरात्री घराला लागली भीषण आग, वृद्धेचा होरपळून मृत्यू; खटाव तालुक्यातील जाखणगावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 15:33 IST2022-02-22T15:26:22+5:302022-02-22T15:33:21+5:30
मध्यरात्रीचा सुमारास घटलेल्या या घटनेमुळे नागरिकांना याची तत्काळ माहिती देता आली नाही.

मध्यरात्री घराला लागली भीषण आग, वृद्धेचा होरपळून मृत्यू; खटाव तालुक्यातील जाखणगावातील घटना
पुसेगाव : जाखणगाव, तालुका खटाव येथील पट्टावस्तीत असलेल्या घराला रात्रीच्या वेळी अचानक भीषण आग लागली. या आगीत एका वृद्धेचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुभद्रा आनंदराव राऊत (वय ७५) असे मृत वृद्धेचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पट्टावस्ती, जाखणगाव येथे राहणाऱ्या सुभद्रा राऊत यांच्या घराला रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररुप धारण केले. सुभद्रा राऊत या झोपेत असल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. मध्यरात्रीचा सुमारास घटलेल्या या घटनेमुळे नागरिकांना याची तत्काळ माहिती देता आली नाही.
तर, रात्रीची वेळ असल्याने कुणीही आग विझवण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे आगीच्या ज्वालांनी घराला वेढले. आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास पो. ना. लुबाळ करत आहेत.