शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’बाबतची सुनावणी उद्या, न्यायालयाच्या आदेशावर ठरणार निवडणुकीचे भवितव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:28 IST

सभासद यादीतील ११०८ संस्थांचा वाद 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ११०८ दूध संस्था सभासदांबाबत आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच पुढे होणारी सुनावणी आता उद्या, बुधवारी होणार असल्याचे समजते. न्यायालयाच्या आदेशावर संघाच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्याने जिल्ह्यातील दूध संस्थांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.‘गोकुळ’ने दुग्ध विभागाकडे सादर केलेल्या ५४७० संस्था सभासद यादीतील ११०८ सभासदांविरोधात प्रकाश बेलवाडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचकडे याचिका दाखल केली आहे. शासनाच्या नियमानुसार या संस्थांचे दूध संकलन नसल्याची त्यांची हरकत आहे. याबाबत दोनवेळा सुनावणी झाली आहे. त्यावर आज, पुन्हा सुनावणी होणार होती. पण, पटलावर दिसत नसल्याने याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उद्या सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केल्याचे समजते. न्यायालय नेमका निर्णय काय देते? यावरच संघाच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

प्राधिकरणाचीही सावध भूमिकासहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार दुग्ध विभागाने ‘गोकुळ’च्या प्रारूप यादीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार ९ मार्चपासून संलग्न दूध संस्था प्रतिनिधींच्या नावाचे ठराव मागवले जाणार होते. मात्र, सभासदांचा मुद्दा न्यायालयात असल्याने दुग्ध विभागाने याबाबत निवडणूक प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले होते. मात्र, अद्याप त्यांच्याकडून काहीच आले नसल्याचे समजते.

परवाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने १७ मार्चला सुनावणीची तारीख दिली होती. पण न्यायालयाच्या पटलावर तारीख दिसत नसल्याने आम्ही वकिलांमार्फत उद्या सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. - प्रकाश बेलवाडे (याचिकाकर्ता)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: 'Gokul' hearing tomorrow; election fate depends on court order.

Web Summary : The Bombay High Court will hear the 'Gokul' milk union case tomorrow. Prakash Belwade filed a petition against 1108 members. The cooperative election authority is also awaiting guidance due to the court case. The court's decision will determine the election's future.