Kolhapur: तीन दरवाजा बंद का केला म्हणत गाईडने शिपायाला कानशिलात लगावली, पन्हाळा गडावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:04 IST2025-05-08T13:03:54+5:302025-05-08T13:04:09+5:30
पोर्ले तर्फ ठाणे : पर्यटक आत असताना पन्हाळा गडावरील तीन दरवाजाचा दरवाजा शिपायाने लावला म्हणून एका गाईडने त्या शिपाईच्या ...

Kolhapur: तीन दरवाजा बंद का केला म्हणत गाईडने शिपायाला कानशिलात लगावली, पन्हाळा गडावरील घटना
पोर्ले तर्फ ठाणे : पर्यटक आत असताना पन्हाळा गडावरील तीन दरवाजाचा दरवाजा शिपायाने लावला म्हणून एका गाईडने त्या शिपाईच्या चक्क कानशिलात लगावली. ही घटना मंगळवारी (दि. ६) सांयकाळी सहाच्या सुमारास तीन दरवाजा येथे घडली. स्थानिकांनी प्रकरणाची मिटवामिटवी केली असली, तरी पन्हाळा पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक (एनसीआर) पद्धतीने गुन्हा नोंदवला आहे.
सध्या सुट्टीमुळे पन्हाळा गडावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांना ऐतिहासिक गडाची माहिती गाईडद्वारे दिली जाते. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तीन दरवाजा परिसरातील ऐतिहासिक आणि पौराणिक वास्तूची माहिती एक गाईड देत होते.
दरम्यान, नेहमीप्रमाणे एका शिपायाने तीन दरवाजाचा दरवाजा बंद केला. पर्यटक आत असताना तू दरवाजा का बंद केलास? यावरून शिपाई आणि त्या गाईडमध्ये हमरीतुमरी झाली. याचे पर्यावसन भांडणात झाले. यावेळी रागाच्या भरात गाईडने शिपायाच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतर गडावरील काही लोकांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवले.